गोंदिया :- ग्राम कुडवा तालुका गोंदिया येथे मोक्षधाम परिसरात व ग्राम कटंगीकला तालुका गोंदिया येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते व सरपंच बाळकृष्ण पटले व जिल्हा परिषद, समाजकल्याण सभापती पूजा अखिलेश सेठयांच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी अजित पवार यांचा वाढदिवस साजरा करतांना दिर्घायुष्य व निरोगी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.
वृक्षारोपण प्रसंगी सर्वश्री बालकृष्ण पटले, सरपंच मोहिनी वराडे, केतन तुरकर, अखिलेश सेठ, शैलेश वासनिक, ग्राम पंचायत सदस्य सदाशिव वाघाडे, घनश्याम पटले, रविकाला नागपुरे, दीपक डोंगरवार, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष संजू बनकर, प्रदीप चौधरी, रफिक शेख, अनिल धावडे, तेलांनी, कापसे, बावनकर, जयेंद्र पटले, बंडू ठाकरे, महेश तांडेकर, काजू पतेह, रजत गाडेवार, आशिष बावनथडे, अरविंद पारासर, कमल पारधी, गीता चौधरी, अलका शांडे, पायल बागडे, सुंदरी तांडेकर, भोजराज तुरकर, संजय शेंडे, बुद्धरत्न बागडे, माधुरी तुरकर, सुरज उंबरे, पूरशु बिसेन, भूपेश पारधी, दुर्गा बहादुर परिहार, नूतन पटले, शिव अंबुले, मिनू शेंडे, रौनक ठाकूर सहित नागरिक उपस्थित होते.