प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉ. नितीन कोडवते, डॉ.चंदा कोडवते यांचा भाजपामध्ये प्रवेश

गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस नेते, प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉ. नितीन कोडवते व त्यांच्या पत्नी डॉ.चंदा कोडवते या दांपत्याने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला खा.अशोक नेते, आ.बंटी भांगडिया, बाबुराव घोडे, मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे,भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. कोडवते पती पत्नीच्या भाजपा प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीच्या संघटना वाढीसाठी मदत होईल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी बावनकुळे म्हणाले की,डॉ.कोडवते यांनी कोरोना काळात गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाजाची निरपेक्षपणे सेवा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत घडवण्याच्या संकल्पाला साथ देण्यासाठी डॉ.कोडवते दाम्पत्याने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. भाजपामध्ये प्रवेश केलेल्या सर्वांच्या पाठीशी एक कुटुंब या नात्याने पक्ष संघटना खंबीरपणे उभी राहील.

डॉ.कोडवते दांपत्याने कोणतीही अपेक्षा न ठेवता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या होत असलेल्या विकासाने प्रेरित होऊन भाजपामध्ये आलेल्या कोडवते पती पत्नीच्या नेतृत्वाला योग्य संधी, सन्मान दिला जाईल अशी ग्वाही बावनकुळे यांनी यावेळी दिली.

मोदी सरकारच्या विकास कार्याने प्रभावित होऊन आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या विकासाच्या संकल्पनेवर विश्वास ठेवून गडचिरोली जिल्ह्याचा विकासासाठी हा निर्णय घेतला आहे. यापुढे भाजपासाठी निरपेक्ष भावनेने काम करू असे डॉ.नितीन व डॉ.चंदा यांनी यावेळी सांगितले. डॉ.चंदा यांनी 2019 मध्ये गडचिरोली विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवत 70 हजार मते मिळवली होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विद्युत नियंत्रण मंडळ स्पर्धेसाठी नागपूर येथे निवड चाचणी

Fri Mar 22 , 2024
नागपूर :- हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र येथे येत्या 28 ते 31 मार्च 2024 दरम्यान आयोजित 45 व्या अखिल भारतीय विद्युत नियंत्रण मंडळ स्पर्धा- 2024 करीता महावितरण संघाच्या निवड चाचणीचे आयोजन शुक्रवारपासून (दि. 22 मार्च) महावितरणच्या कला व क्रीड़ा क्लब, गद्दीगोदाम, नागपूर येथे करण्यात आले. या निवड चाचण्यांमधून या स्पर्धेकरिता महावितरणचे बुद्धिबळ, कॅरम, टेबल टेनिस टेनिक्वाईट आणि बॅडमिंटन या खेळात सहभागी होणा-या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com