चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोन आरोपींना परराज्यातून अटक

नागपूर :- गुन्हेशाखा, युनिट दिनांक २८/०३/२०२४ चे ११.३० वा. चे सुमारास पोलीस ठाणे बेलतरोडी हद्दीत एलॉट नं. ०४, प्रिया हाउसिंग सोसायटी साकेत नगरी बेलतरोडी रोड येथे राहणाऱ्या फिर्यादी आशा रामदास थुल वय ६५ वर्ष, हया त्यांचे डेली निडस् व जनरल स्टोर्स ने दुकानात हजर असतांना त्यांचे दुकानासमोर एका काळया रंगाचे मोटर सायकलवर दोन अनोळखी ईसम वय २० ते २५ वयोगटाचे यांनी येवुन त्यापैकी एकाने फिर्यादीस चिप्स व थम्सअप ची बॉटल मागीतली परंतु त्याने बॉटल थंडी नाही असे म्हणून फिर्यादीस आवाज दिला, फिर्यादी हया कांउंटर टेवल जवळ आल्या असता, आरोपीने फिर्यादीचे गळयातील १५ ग्रॅम सोन्याची साखळी किमती ६०,०००/- रू ची जबरीने हिसकावुन पळुन गेला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे बेलतरोडी येथे कलम ३९२, ३४ भा.द.वी. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हेशाखा युनिट क. ०४ चे अधिकारी व अंमलदार नमुद गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना, दि. २८. ०३.२०२४ रोजी नागपूर शहरामध्ये एका मोटारसायकलवरील २ अनोळखी आरोपीताांनी पो.ठाणे बेलतरोडी, सक्करदरा, हुडकेश्वर, तहसील, सोनेगाव हददीअंतर्गत एकूण ०६ चैनस्नेचींग केल्याचे निदर्शनास आले. चैनस्नेचींगचे घडलेले अनुशंगाने पोलीस ठाणे ०१) बेलतरोडी येथे अपराध कमांक २३२/२४ कलम ३९२,३४ भादवि ०२) सक्करदरा येथे अपराध कमांक १२४/२४ कलम ३९२,३४ भादवि ०३) हुडकेश्वर येथे अपराध कमाक २३८/२४ कलम ३९२.३४ भादवि ०४) हुडकेश्वर येथे अपराध कमाक २३९/२४ कलम ३९२,३४ भादवि ०५) तहसील येथे अपराध कमाक २०४/२४ कलम ३९२,३४ भादवि ०६) सोनेगाव अपराध क्रमांक ५८/२४ कलम ३९२,३४ भादवि अन्वये गुन्हे दाखल आहेत.

गुन्हेशाखा, युनिट कमांक ०४, पथकाने सदर गुन्हयाचे संबंधाने त्वरीत गुन्हयाचे घटनास्थळी भेटी दिल्या. गुन्हयातील फिर्यादी यांचेकडून अनोळखी दोन्हीही आरोपीताविषयी परीपुर्ण माहीती एकत्रीत केली. आरोपीतांची गुन्हे करण्याची पध्दतीचे अवलोकन करून आरोपीतांचा शोध घेणेकामी गुप्त बातमीदार नेमले, नमूद पथकात कार्यरत पोहवा नाजीर शेख यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहीती प्राप्त झाली की, नमूद गुन्हे हे जाफर अली भोलू अली तसेच जहीर हुसैन वल्द मोहम्मद विहारी रा. दोघेही खरीया रोड, पुराणी चौक, जिल्हा न्युआपाडा, राज्य ओडीसा यांनी केलेले आहेत. ही माहीती वरिष्ठ अधिकारी यांना देवून त्यांचे परवानगीने नमुद गुन्हयाचे तपास कामी पथक ओडीसा येथे रवाना झाले.

गुन्हे शाखा पोलीसांचे पथक ओडीसा राज्य येथे जावून त्यांनी स्थानीक पोलीसांचे मदतीने नमूद गुन्हयाचा तपास करून बुध्दीकौशल्याचा वापर करून गुन्हयातील नमूद आरोपींची अचूक माहीती काढून सापळा रचुन त्यांना अतिशय शिताफीने ताब्यात घेतले. आरोपी १) जाफर अली घोलु अली वय १९ वर्ष रा. वार्ड नं. १४ खरीया रोड. धोवी पारा, जि. न्यू आपाडा राज्य ओडीसा पोठाणे जॉकथाना २) जहीर हुसेन बल्द मोहम्मद बिहारी रा. वार्ड नं. १३ खरीया रोड, नुरानी चौक, जि. न्युआपाडा, राज्य ओडीसा, पोठाणे जोंकथाना, यांनी नागपूर शहरात दि. २८.०३.२०२४ रोजी दाखल चैनस्नेचींगचे गुन्हयाची कबूली दिली. आरोपीतांकडून नमूद ६ गुन्हयातील जबरीने हिसकावून नेलेला पिवळे धातुचे मंगळसुत्र, चेन, गोफ तुटलेले अवस्थेत असा एकूण ६८ ग्रॅम वजनाचा व किमती ४,०८,०००/-रू, चा मुददेमाल व गुन्हा करणेकरीता वापरलेले वाहन बजाज कंपनीची लाल काळया रंगाची एन. एस. २०० पल्सर गाडी नंबरप्लेट नसलेली किमती १,००,०००/- रू. तसेच गुन्हा करते वेळी वापरलेले हेल्मेट किमती ३०००/-रू, व दोन मोबाईल फोन किमती २१,०००/- रू असा एकूण ५,३२,०००/- रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला.

आरोपींची सखोल विचारपुस केली असता नमूद गुन्हे करणेकामी त्यांचा साथीदार पाहीजे आरोपी नामे हैदर अली अकरम अली वय अंदाजे २२ वर्षे रा. वार्ड क्रमांक १४, धोबीपारा, जिल्हा न्युआपाडा, हा देखील नागपूर येथे त्यांचेसह आला होता. त्याने देखील गुन्हे करते वेळी ओडीसा येथून नागपूर येथे येणेकरीता व गुन्हे केल्यानंतर नागपूर येथून ओडीसा येथे जाणेकरीता त्यांचे वाहन चालवून आरोपीतांना मदत केली आहे. आरोपी क. ०२ हा चैन स्नेचींगचा अटटल गुन्हेगार असून त्याचेविरूध्द ओडीसा राज्यात विविध पोलीस ठाणे अंतर्गत एकूण २१ चैनस्नेचींगचे गुन्हे दाखल आहेत.

गुन्हेशाखा युनिट क्र. ०४ यांनी नागपर शहरात धुमाकुळ घालणारे परराज्यीय चैनस्नेचर यांची अचूक माहीती काढून, त्यांना परराज्यातून अतिशय बुध्दीकौशल्याने व शिताफीने ताब्यात घेवून, त्यांचेकडून चैन स्नेचींगचे ०६ गुन्हे उघडकीस आणले. गुन्हयातील मुददेमाल जप्त करून मोलाची व प्रशंसनीय कामगीरी केली आहे. सदरची कारवाई डॉ. रविंद्र कुमार सिंगल, सह पोलीस आयुक्त सो नागपूर शहर,अश्वती दोर्जे , सह. पोलीस आयुक्त सो, संजय पाटील अष्पर पोलीस आयुक्त (गुन्हे), निमीत गोयल, पोलीस उपायुक्त (डिटेक्शन)  डॉ. अभिजीत पाटील, सहायक पोलीस आयुक्त डिटेक्शन यांचे मार्गदर्शनाखाली पोनि रमेश ताले, पोउपनि वैभव वारंगे, पोहवा नाजीर शेख, निलेश ढोणे, सतीष ठाकरे, युवानंद कडु, आशिष क्षिरसागर, पुरुषोत्तम जगनाडे, नापोअ चेतन गेडाम, अजय पौनिकर, अनंता क्षिरसागर, पोज, महेश काटवले, सत्येंद्र यादव, लिलाधर भेंडारकर, यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ORDER DETAINING NOTORIOUS GOON DIKSHIT @ GUTHALI MILIND BHAGAT UNDER MPDA QUASHED 

Tue Apr 2 , 2024
Nagpur :- Division Bench presided over Vinay Joshi and Vrushali Joshi JJ have quashed and set aside order of detention dated 28-09-2023 passed by Collector/District Magistrate, Wardha thereby detaining him under sec 12 (1) of Maharashtra Prevention of Dangerous Activities of Slumlords, Bootleggers, Drug offenders, Dangerous persons and Video Pirates Act, 1981. Dikshit @Guthali Milind Bhagat was detained under section […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights