चारपदरी महामार्गावर डुमरी नवीन उडाण पुलासामोर दोन दुचाकी वाहनाचा भिषण अपघात

मोतीराम रहाटे, प्रतिनिधी

 एक महिला गंभीर जख्मी, एव्हेंजर दुचाकी वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल. 

 कन्हान (नागपुर) : – पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावर डुमरी नविन उडाण पुलासमोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या एव्हेंजर दुचाकी वाहन चालकाने मोपेड दुचाकीला समोरून धडक मारल्याने झालेल्या अपघातात एक महिला गंभीर जख्मी झाल्याने कन्हान पोलीसांनी पोस्टे ला एव्हेंजर दुचाकी वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

प्राप्त माहिती नुसार रमेश महादेवराव ऊईके वय ५२ वर्ष रा. रामटेक हे मंगळवार (दि.७) फ्रेब्रुवारीला रात्री ८ वाजता आपल्या घरी हजर असतां ना जे.एन. हॉस्पीटल कांद्री येथुन फोन करून सांगितले की ” तुमची पत्नी माधुरी उईके हिचा अपघात झाला आहे. त्यांना जे.एन. हॉस्पीटल कांद्री येथे उपचारार्थ भर्ती केले आहे. या माहितीने रमेश ऊईके व मित्र उद्धव सोयाम सोबत जे.एन. हॉस्पीटल कांद्री कडे येत असतांना रमेश ला जे.एन. हॉस्पीटलच्या रूग्णवाहिका चालकाने फोन करून सांगितले की ” तुमच्या पत्नीला जास्त मार लागल्याने मी त्यांना चौधरी हॉस्पीटल कामठी येथे घेऊन जात आहे ” यामुळे रमेश व मित्र चौधरी हॉस्पीटल कामठी येथे पोहचले असता रमेश यांच्या पत्नीचा उपचार सुरु होता व ती बेशुध्द अवस्थेत होती. बुधवार (दि.८) ला सकाळी ८ वाजता पत्नी शुध्दीवर आल्यानंतर रमेश यांनी पत्नीला अपघाता बाबत विचारले असता ” तिने सांगितले की, मी मंगळवार (दि. ७) फेब्रुवारीला कार्यालयाचे काम आटोपुन मोपेड दुचाकी क्र. एम एच. ४० ए एच ७७६४ ने रामटेक घरी परत येत असतांना रात्री ७.४५ वाजता दरम्यान डुमरी नविन उडाण पुलासामोर विरुद्ध दिशेन येणारी एव्हेंजर दुचाकी वाहन क्र. एमएच. ४०. ए वाय ६४८९ च्या चालकाने दुचाकी वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन माझ्या मोपेड दुचाकीला समोरून धडक मारल्या ने मी दुचाकीसह खाली पडल्याने माझ्या डाव्या पाय फ्रेंक्चर झाला असुन कान फुटला व खांद्याला मुका मार लागल्याचे सांगितल्याने रमेश ऊईके यांनी कन्हान पोलीस स्टेशन ला एव्हेंजर दुचाकी वाहन चालका विरुद्ध तक्रार दिल्याने पोलीसांनी एव्हेंजर दुचाकी वाहन चालका विरुद्ध कलम २७९, ३३७, ३३८ भादंवि सहकलम १८४ मोवाका अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोस्टे चे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार आतिश मानवटकर हे करित आरोपीचा शोध घेत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रमेश बैस बने महाराष्ट्र के नए राज्यपाल..

Sun Feb 12 , 2023
मुंबई –  राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू द्वारा भगत सिंह कोश्यारी के इस्तीफे को मंजूर करने के बाद रमेश बैस को महाराष्ट्र का राज्यपाल बनाया गया है. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने महाराष्ट्र के राज्यपाल के रूप में भगत सिंह कोश्यारी  का इस्तीफा स्वीकार कर लिया है. महाराष्ट्र के राज्यपाल के साथ-साथ लद्दाख के उपराज्यपाल राधा कृष्णन माथुर के इस्तीफे को भी स्वीकार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com