नागपूर :-फिर्यादी मनिष हरीदास मेश्राम, वय ३७ वर्षे, रा. प्लॉट नं. ८१, लोकसेवा नगर, प्रतापनगर, नागपूर यांचे मित्र डोंगरे यांनी त्यांची ओळख आरोपी १) मोहम्मद तारीक कादरी, वय ५२ वर्षे २) बेगम गुलाबी मोहम्मद कादरी, वय ४५ वर्षे, दोन्ही राहणार बालसोर बाजार, मस्जीद जवळ, ओडीसा यांचेसोबत करून दिली व पोलीस ठाणे गणेशपेठ हद्दीत फ्लॅट नं. ७०२, महाडा कॉम्प्लेक्स, गणेशपेठ येथे आरोपी यांची एफ व्ही. एम. अॅडव्हायझरी अॅण्ड कन्सल्टंस प्राय. लिमिटेड नावाने कंपनी असून, त्यामध्ये आरोपी क. १ हे एम.डी. असून त्यांची पत्नी आरोपी क. २ ही कंपनीत काम करीत असल्याचे सांगीतले. आरोपिंनी फिर्यादीस त्यांचे कंपनीत गुंतवणुक केल्यास ३ टक्के व्याजदर मिळेल असे सांगीतले. फिर्यादी यांनी कंपनीचे दोन खात्यात सुरूवातीला १०,०००/- रू. टाकले असता, फिर्यादीचे खात्यावर कंपनीने व्याजाची रक्कम पाठविली. त्यामुळे फिर्यादीचा विश्वास बसला दिनांक २३.०९.२०१९ ते दिनांक १२.०६.२०२० दरम्यान फिर्यादी यांनी दोन लाख रुपयाची गुंतवणुक केली. फिर्यादी यांनी त्यांचे ईतर नातेवाईक, मित्र यांना सुध्दा गुंतवणुक करण्यास सांगीतले. फिर्यादी हे गुंतवणूक केलेली रक्कम काढण्यास गेले असता, फिर्यादीचे खात्यात रक्कम जमा न झाल्याने फिर्यादी हे नमुद घटनास्थळी कार्यालयात गेले असता, कार्यालय बंद होते. आरोपी क. १ व २ तसेच, आरोपी ३) दुमदेव छोटेलाल चौरागडे, वय ४२ वर्षे, रा. एलॉट नं. २. राधेशाम नगर, जयताळा, नागपुर ४) प्रकाश कांबळे, वय ५४ वर्षे, रा. पुर्ती बाजार समोर, मनिष नगर, नागपुर ५) रूपेश भिमराव वायकर, वय ४४ वर्षे, रा. धामना, अमरावती रोड, ६) शिवशंकर ज्ञानेश्वर हातागडे, वय ४२ वर्षे, रा. बोदरी, रामटेक, नागपुर यांनी संगणमत करून फिर्यादी व ईतर लोकांना ३ टक्के व्याजाचे आमिष दाखवून सुरुवातीला व्याजाची रक्कम खात्यात दर्शवुन फिर्यादी व ईतर १५ लोकांकडुन एकूण ४०,८१,०००/- रू. गुंतवणुक महणुन घेवुन, कोणतेही व्याज वा मुद्दल परत न देता, कंपनीचे कार्यालय बंद करून फिर्यादी व इतरांची आर्थिक फसवणुक केली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून व प्राप्त अर्जाचे चौकशीवरून पोलीस ठाणे गणेशपेठ येथे सपोनि राठोड यांनी आरोपीविरूद्ध कलम ४०९, ४२०, ३४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंदवून, पुढील तपास करीत आहे.