घरफोडी करणा-या अट्टल चोरट्याला अटक

– नागपुर ग्रामीण पोलीसांची कार्यवाही 5 घरफोडीचे गुन्हे उघड

सावनेर :- फिर्यादी नामे सुरेश शंकर डिगे वय 23 वर्षे रा. वार्ड क्र. 04 खापरखेडा ता. सावनेर याची पत्नी राहते घराला कुलुप लावून अंगणवाडी येथे मुलीला घेवुन गेली असता कोणीतरी अज्ञात चोराने फिर्यादीचे राहते घराचे समोरील दाराचे कुलूप तोडुन घराचे आत प्रवेश करुन लोखंडी आलमारी ठेवलेले सोने आणी चांदीचे दागीने चोरुन नेल्याचे रिपोर्ट वरुन पो. स्टे. खापरखेडा येथे अप क्र. 85/2024 कलम 454,380 भादवी अन्वये गुन्हा नोंद असुन तपासा दरम्यान गुप्त माहीतीच्या आधाराने आरोपी नामे 1) प्रविन उर्फ कालु डालीराम पोचपोगडे वय 23 वर्षे रा. संजीवनी नगर कांद्री कन्हान ता. पारशिवनी 2) विक्की उर्फ विडो राजु बोरकर वय 25 वर्षे रा. कामगार नगर कामठी यांना ताब्यात घेवुन सखोल विचारपुस केली असता त्यांनी खापरखेडा वार्ड नं. 04 येथे चोरी केल्याची कबुली दिली त्यांचे ताब्यातुन पो. स्टे, खापरखेडा येथील गुन्ह्यात चोरी गेलेला संपुर्ण सोन्या चांदीचे दागीने मुद्देमाल हस्तगत करुन त्यांना अधिक विचारपुस केली असता त्यांनी पो. स्टे. कन्हान हद्दीत स्वामी विवेकानंद नगर कन्हान येथील घरफोडी 2) पो. स्टे. रामटेक हद्दीत शबरी होटल चे मागे, पो. स्टे. पारशिवनी येथे करंभाड तसेच पो. स्टे. खापा येथे खैरी पंजाब येथील घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपी कडुन एकुण 5 घरफोडी उघडकीस आणले.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान विभाग कन्हान संतोष गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन खापरखेडा येथील ठानेदार धनाजी जळक यांचे नेतृत्वात पो. उपनिरीक्षक आरती नरोटे, पोलीस हवालदार प्रफुल राठोड, शैलेश यादव, राजु भोयर, मुकेश वाघाडे, पोलीस अंमलदार राजकुमार सातुर मपोहवा कविता गोंडाने, यांचे पथकाने पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रतिबंधीत सुंगधीत तंबाखू व गुटख्यावर ग्रामीण पोलीसांची कारवाई २ आरोपीतांना अटक, एकूण ८,२९,५२०/-रू चा माल जप्त

Fri May 3 , 2024
नागपूर :- दिनांक ३०.०४.२०२४ रोजी मध्यप्रदेश राज्यातुन केळवद मार्गे स्विफ्ट डिझायर गाडी क एमएच ४९ विडबल्यु ७६०८ या पांढ-या रंगाच्या गाडीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु व गुटख्याची वाहतुक होणार आहे अशी खात्रीशीर माहीती सावनेर पोलीसांना मिळाली असता, लागलीच सदरची माहीतीचे अनुषंगाने कारवाई करण्याकरीता पथक पाठविण्यात आले. अंदाजे १६.०० वा दरम्यान मौजा केळवद, पांडुर्णा रोड टि पाईंट वरील ओवार ब्रिज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com