प्रतिबंधीत सुंगधीत तंबाखू व गुटख्यावर ग्रामीण पोलीसांची कारवाई २ आरोपीतांना अटक, एकूण ८,२९,५२०/-रू चा माल जप्त

नागपूर :- दिनांक ३०.०४.२०२४ रोजी मध्यप्रदेश राज्यातुन केळवद मार्गे स्विफ्ट डिझायर गाडी क एमएच ४९ विडबल्यु ७६०८ या पांढ-या रंगाच्या गाडीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु व गुटख्याची वाहतुक होणार आहे अशी खात्रीशीर माहीती सावनेर पोलीसांना मिळाली असता, लागलीच सदरची माहीतीचे अनुषंगाने कारवाई करण्याकरीता पथक पाठविण्यात आले. अंदाजे १६.०० वा दरम्यान मौजा केळवद, पांडुर्णा रोड टि पाईंट वरील ओवार ब्रिज सावनेर येथे नाकाबंदी करीत असतांना थोडयाच वेळात सदर क्रमांकाची गाडी येतांना दिसली त्या गाडीला थांबवुन सदर गाडीची तपासणी केली असता, गाडीमध्ये दोन इसम मिळून आले. त्यांना त्याचे नाव, गाव, विचारले असता चालक याने आपले नाव १. पंकज नत्थुजी इटनकर वय ३८ वर्ष व त्याचा भाउ नामे २. पवन नत्थुजी इटनकर वय ३४ वर्ष दोन्ही रा. प्लॉट क १२८/अ नेताजी नगर, भंडारा रोड नागपुर असे सांगितले, गाडीची झडती घेतली असता गाडीचे डिक्कीमध्ये व मागच्या सिटवर छोट्या मोठ्या अश्या एकुण १५ प्लास्टीक बो-या दिसल्या, त्याची पाहणी केली असता बोरीमध्ये २२ प्रकारचे वेगवेगळे सुगंधीत तंबाखु व गुटखा एकुण वनज १३१ किलोग्रॅम कि १,२९,५९०/रू चा माल व स्विफ्ट डिझायर गाडी क एमएच ४९ विडब्ल्यु ७६०८ कि ७,००,०००/रू असा एकुण ८,२९,५२०/- रू चा माल जप्त करण्यात आला. सदरचा सुगंधीत तंबाखु व गुटखा महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधीत असल्याने लगेच अन्न व औषध प्रशासन विभाग चे अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती स्मिता वाभरे यांना घटनास्थळी बोलविण्यात आले. त्यांचे रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन सावनेर येथे अपराध क ४५७/२४ कलम ३२८,२७२,२७३,१८८, भादवि सहकलम २६ (१),२६ (२), (iv), २७(३) (e), ३०(२) (a), सहवाचन कलम ३ (१) (zz), (iv), अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर ची कार्यवाही हर्ष पोद्दार, पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण, रमेश भुमाळ अपर पोलीस अधिक्षक, सहायक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल मस्के यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर, सहायक पोलीस निरीक्षक अनिल राउत, मंगला मोकासे, ग्रेड पो उपनि राजु कडु, सफौ गणेश रॉय, पोहवा अविनाश बाहेकर, रवि मेश्राम, पोलीस अंमलदार दाउद शेख, दिपक जोगेकर यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राहुल गांधीची चायनीज गँरंटी आणि मोदीजींची भारतीय गॅरंटी यांची ही निवडणूक!

Sat May 4 , 2024
– सांगलीतील सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हल्लाबोल सांगली :- या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा आहे. एका बाजूस व्होट जिहाद पुकारणारे लोक आहेत, तर दुसरी बाजू व्होट फॉर विकास मानणारे आहेत. एका बाजूला परिवाराचा विकास करणारे लोक, तर दुसऱ्या बाजूला मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास करणारे लोक आहेत. एका बाजूस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com