जागतीक हिवताप दिनानिमीत्य विशेष जनजागृतीपर मोहीम

– प्रा.आ.केंद्र हिवरा बाजार व उपकेंद्रांमध्ये राबविली मोहीम

रामटेक :- जागतिक हिवताप दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र हिवरा बाजार व उपकेंद्र स्तरावर विशेष जनजागृतीपर मोहीम राबविण्यात येत आहे. जागतिक हिवताप दिनानिमित्त तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चेतन नाईकवार यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी त्यामध्ये सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन डॉ.प्राजक्ता गुप्ता वैद्यकीय अधिकारी हिवरा बाजार व आरोग्य सहायक निरंजन चिकटे, माधव धुर्वे यांनी केले आहे.

या मोहिमेमध्ये प्रभात फेरी, हिवताप संदर्भातील माहिती विषयक प्रदर्शन, आठवडी बाजार येथे केले होते. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप आजार आणि त्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र हिवराबाजार येथील आरोग्यसेवक, सेविका, आशा वर्कर यांच्यामार्फत डास अळी सर्वेक्षण, कंटेनर सर्वेक्षण, जलद ताप सर्वेक्षण, डासोतपती स्थानात गप्पी मासे सोडणे, व्हेंट पाईप ला जाळ्या लावणे, आरोग्य शिक्षण देणे अशा माध्यमातून जनजागृती या मोहिमेदरम्यान करण्यात आली. कोणताही ताप, उलटी, मळमळ असा त्रास जाणवल्यास त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा उपकेंद्रात जाऊन हिवताप / डेंगू साठीचा तपासणी निशुल्क करून घ्यावी असे आवाहनही वैदयकीय अधिकारी डॉ. प्राजक्ता गुप्ता, डॉ.अश्विनी डंभारे आरोग्य सहाय्यक निरंजन चिकटे, माधव धूर्वे आरोग्य सहायिका राऊत, शेख,आरोग्य सेवक ईसलवार व घुगे यांनी केलेले आहे.आरोग्य सेविका व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावरील सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कॅन्सर मुक्त भारतासाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट-एनसीआय ही संस्था म्हणत्वाची भूमिका बजावेल - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन   

Thu Apr 27 , 2023
– नागपूरातील जामठा येथे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे लोकार्पण  नागपूर :- संशोधनाच्या जोरावरच आपण कॅन्सर सारख्या रोगाला रोखू शकतो. कॅन्सर मुक्त भारतासाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट-एनसीआय ही संस्था महत्वाची भूमिका बजावेल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. नागपूरातील आऊटर रोड जामठा येथे डॉ.आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेद्वारे स्थापित नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट- एनसीआयच्या लोकार्पण सोहळ्याला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com