नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सहाव्या खासदार क्रीडा महोत्सवा अंतर्गत गुरूवारी (ता. १७) विवेकानंद नगर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे तायक्वाँडो स्पर्धेतील सबज्यूनिअर्स गटात नीरव घारपुरे आणि आरोही चकोले यांनी आपापल्या वजन गटात यश मिळवित सुवर्ण पदक पटकाविले.
12 वर्षाखालील मुलांच्या सबज्यूनिअर्समध्ये 25 किलोखालील वजनगटात नीरवने शास्वत ढेंगेला मात देत प्रथम क्रमांक पटकावित सुवर्ण पदकावर नाव कोरले. शास्वतला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. शियान तिरपुडेने कांस्य तर अर्णव भुंबरने दुस-या क्रमांकाचे कांस्य पदक मिळविले. 12 वर्षाखालील मुलींच्या सबज्यूनिअर्समध्ये 24 किलोखालील वजनगटात आरोही चकोलेने स्मितल सोनकुसरे विरुद्ध सुवर्ण पदक पटकाविले. या सामन्यात स्मितलला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. कृती गणवीर आणि संचिता पडोळे यांनी कांस्य पदक आपल्या नावे केले.
निकाल (अनुक्रमे 1 ते 4)
सबज्यूनिअर मुले (12 वर्षाखालील)
18 किलोखालील गट– अंशुमन सोनटक्के, कैवल्य पवार, रिनेश गिरेपुंजे, क्षितीज पाचभाई
21 किलोखालील गट– चिराग जंजाले, श्री तिवारी, शोन सूर्यवंशी, आदर्श शिंदे
23 किलोखालील गट– प्रिन्स सेलोकर, नेल्सन माटे, जय लाडे, श्रेयांश गुप्ता
25 किलोखालील गट– नीरव घारपुरे, शास्वत ढेंगे, शियान तिरपुडे, अर्णव भुंबर
29 किलोखालील गट– यानिध्य वासनिक, कैवल्य भोतमांगे, कौस्तुभ गिरडे, विहांक गाईकी
सबज्यूनिअर मुली (12 वर्षाखालील)
16 किलोखालील गट – वेदिका घरोटे, काव्या हातबुडे, फाल्गुनी दडवे, सिमरन चौधरी
20 किलोखालील गट-– पुर्वी मुलपुंडे, तन्वी उरकुडे, मंजरी हटवार, निवा बालपांडे
16-20 किलो वजनगट- प्रिशा मून, गार्गी गजभिये, माहेश्वरी तारेकर, संध्या शेळके
22 किलोखालील गट – सावी जामगडे, आराध्या मिश्रा, कृतिका सोनकुसरे, नित्यश्री कांबळे
24 किलोखालील गट- आरोही चकोले, स्मिलल सोनकुसरे, कृती गणवीर, संचीता पडोळे