मोतीराम रहाटे, प्रतिनिधी
सुरक्षा अभियानाने केली जन जागृती.
कन्हान (नागपुर) : – महामार्ग पोलीस नागपुर प्रादेशिक विभागाच्या रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत वाहनांवर स्टिकर्स, पत्रक वाटप, सार्वजनिक ठिकाणी जनजागृती, रॅली व शालेय विद्यार्थ्यांचे प्रबोधन, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरां मार्फत प्रशिक्षण, स्वयं सेवी संस्थेमार्फत जनजागृती कार्यक्रम, पोलिस रॅली, हॉटेल आणि ढाबा संचालकांचे मार्गदर्शन घेण्यात आले. ही मोहीम २२ जानेवारी ला संपणार असल्याची माहिती प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक सचिन सेलोकर यांनी दिली.
वराडा येथील बंद टोल नाक्याजवळ रस्ता सुरक्षितता बचाव मोहीम सुरक्षा अभियान अंतर्गत महामार्ग पोलीस मदत केंद्र रामटेक कँम्प टेकाडी वराडा यांच्या वतीने सुरक्षा अभियान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन टेकाडी गावचे नवनियुक्त सरपंच विनोद इनवाते यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महामार्ग केंद्राचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सेलोकर, टेकाडी ग्राम पंचायत उपसरपंच, ग्रा प सदस्य सतीश घारड, सचिन कांबळे, भगवानदास यादव, विद्याधर कांबळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सपोनि सचिन सेलोकर यांनी केले. सूत्रसंचालन शैलेश बिनझाडे यांनी केले तर आभार दीपक यादव यांनी व्यकत केले. कार्यक्रमास टेकाडी माजी ग्रा पं सदस्य सिंधु सातपैसे, नामदेव डोळके, मनीष कासेटकर, पंकज वासाडे, रमेश हिरे, गेंदलाल वरकडे, रामकृष्ण दत्त, यशवंत विद्यालय वराडा चे शिक्षक आर बी गभणे, आर व्ही गणवीर, सतिश कुथे, शिंगणे, ठाकरे, मुंगले, विद्यार्थी आदी उपस्थित होते.