परवानगी घेतलेल्या वाहनावरच प्रचाराचा झेंडा, फलक लावता येतील

यवतमाळ :- निवडणूक आयोगाने लोकसभेची निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजकीय पक्ष, उमेदवारांकडून वाहनांवर प्रचाराचे झेंडे, फलक लावले जातील, असे झेंडे, फलक लावण्याबाबत जिल्हादंडाधिकाऱ्यांनी सूचना जारी केल्या आहे.

जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशाप्रमाणे फिरत्या वाहनावर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंड स्क्रिन ग्लासच्या पुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टपापासून 2 फुट उंचीपेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा, ईतर कोणत्याही बाजूने तो लावता येणार नाही.

फिरत्या वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष, उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनांव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर दि.6 जूनपर्यंत लावता येणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा

Sat Mar 23 , 2024
– पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद – भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप यवतमाळ :- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी आयोगाने सी-व्हिजिल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com