पोलीस स्टेशन खापरखेडा हद्दीमधील खापरखेडा टाऊन येथील जुगार अड्डयावर धाड

– पोलीस स्टेशन खापरखेडा यांची कारवाई

खापरखेडा :-दिनांक ०८/०६/२०२३ पोलीस स्टेशन खापरखेडा येथील स्टाफ यांना गुप्त बातमीदारांमार्फत खबर मिळाली की, खापरखेडा टाऊन परिसरामधील व्हिडीओ गेम पार्लर मध्ये इलेक्ट्रॉनीक मशिनवर लोकांकडुन पैसे घेवुन मनोरंजनाचे नावाखाली मशीन वरील अंकावर पैश्याची बाजी लावुन हारजितचा जुगार खेळविला जात आहे. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान विभाग कन्हान याची रेड करणेबाबात परवानगी घेवुन पोलीस स्टेशन स्तरावर ०७ वेगवेगळे पथक तयार करून ०७ वेगवेगळ्या व्हिडीओ गेमपार्लरवर टिम मार्फत रेड केली असता ०७ वेगवेगळ्या व्हिडीओ गेमपार्लर मधुन ८८ इलेक्ट्रॉनिक मशिन किमती अंदाजे १७,६०,०००/-रु. नगदी १८०८०/- रु. व खुर्च्या किंमती अंदाजे ७२००/- रु. असा एकूण १७८५२८० /- रूपयाचा मुद्देमाल गुन्हयात जप्त करण्यात आला आहे. तसेच २६ आरोपीतांना ताब्यात घेण्यात येवुन ०७ गुन्हे नोंद करण्यात आले आहे.. सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण विशाल आनंद (भा.पो.से.) तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात आशित कांबळे सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक तथा अतिरीक्त कार्यभार कन्हान विभाग, प्रविण मुंडे ठाणेदार खापरखेडा, सहायक पोलीस निरीक्षक  दिपक काँक्रेडवार, लक्ष्मी मलकुवार, पोलीस उपनिरीक्षक सुर्यप्रकाश मिश्रा, राजेश पिसे, सहायक फौजदार कैलास पवार, पोलीस हवालदार उमेश ठाकरे, शंकर काकडे, आशिष भुरे, प्रफुल राठोड, विनोद कनोजिया, संजय कासेकर, रंजना नागमोते, पोलीस नायक प्रदिप मने, प्रमोद भोयर, राजु भोयर, मुकेश वाघाडे, दिपक रेवतकर, किशोर येलेकर, बादल गिरी, पोलीस शिपाई शेखर वानखेडे, सदिप वाघमारे, अमित खोब्रागडे, राजकुमार सतुर, शत्रुगन वाहणे, योगेश तितरमारे, शुभांगी घुगल यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पळवून नेणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

Sat Jun 10 , 2023
पो.स्टे. रामटेक :- दिनांक ०७/०६/२०२३ चे १२.३० वा. ते दिनांक ०८/०६/२०२३ चे १४.०० वा. चे सुमारास पो.स्टे. रामटेक हद्दीत फिर्यादी व त्यांची पत्नी हे मालक यांचे घरी कामावर गेले असता फिर्यादीचा मुलगा वय १३ वर्ष एकटाच घरी हजर होता. फिर्यादी व त्याची पत्नी हे ०४.०० वा. कामारून घरी परत आले असता मुलगा हा घरी दिसुन आला नाही. आजुबाजुला व नातेवाईक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com