संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- जग बदलले आहे. सर्व सुखसोयी पायाजवळ आहेत. गरजाही पूर्ण होत आहे. असे असले तरी खरी संपत्ती आरोग्य आणि पर्यावरण आहे मात्र सुदृढ आरोग्य आणि चांगले पर्यावरण हे आपल्यापासून दूर जात आहे. याचे रक्षण हेच आपल्या सुखी जीवनाचे आणि भविष्याचे गमक असल्याने सायकलचा जास्तीतजास्त उपयोग करून आपण आपले आरोग्य चांगले ठेवू शकतो. झाडे लावून त्यांना जगवून पर्यावरणाचे संरक्षण आणि होणारा ऱ्हास टाळू शकतो. तेव्हा सायकल चालवा त्यातून आपले आरोग्य आणि झाडे लावून पर्यावरण चांगले ठेवा, असा संदेश सायकल चालवण्यातून वर्धा जिल्ह्यातील दोन तरुण आज सोमवारी नागपूर जीरो माईल येथून सायकलने नवी ऊर्जा व प्रेरणा घेऊन सायकलस्वार नेपाळ मार्गे आयोध्याकडे रवाना झाले आहेत.
दररोज सायकल चालवल्याने पेट्रोलवर होणारा अनावश्यक खर्चही टाळता येतो. यातून एक ना अनेक फायदे होत असल्याने सायकल चालवण्याचा संदेश आम्ही या प्रवासातून देत असल्याची माहिती सायकलस्वार विजय गीचारे व सुरज बांगळे यांनी दिली.विजय व सूरज हे. दोघेही 30 वर्षे वयोगटातील आहे. . विजय व सूरज ह्या दोघांनी नागपूर ते नेपाळ ,अयोध्या हा मार्ग एक महिन्याचा भ्रमण राहणार असून नागरिकांमध्ये आरोग्यासह वाढते प्रदूषण, वाढते तापमान,जल प्रदूषण ,ध्वनी प्रदूषणसह पर्यावरणाबाबत जनजागृतीपर संदेश दिला.यावेळी पर्यावरण संवर्धन,वृक्ष लागवड मोहीम तसेच आरोग्याचे रक्षण संदर्भात जनजागृती करताना विविध अनुभव येणार असल्याचे विचार व्यक्त केले.