कल्पतरू कॉलोणीतून दिवसाढवळ्या लॅपटॉप चोरीला..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 27 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कल्पतरू कॉलोनी मध्ये मागील दोन दिवसात दिवसाढवळ्या अज्ञात चोरट्याने घरातुन लॅपटॉप चोरीला नेल्याची घटना घडली असून यासंदर्भात फिर्यादी अजयकुमार सुरेशकुमार श्रीवास्तव वय 50 वर्षे रा कल्पतरू कॉलोनी कामठी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध कलम 380 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहीती नुसार फिर्यादी अजयकुमार श्रीवास्तव हे कुटुंबासह पेंच येथे फिरण्याकरिता गेले असता सायंकाळी घरी आले असता घरी असलेले साहित्यापैकी एक लॅपटॉप 15 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी गेल्याचे निदर्शनास आले त्यावरून पोलिसात तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Next Post

अर्थव्यवस्थेला गती, युवकांना नोकऱ्या ही शासनाची प्राथमिकता, शेतकरी कर्जमुक्ती, आपला दवाखाना योजना, रोजगार मेळावे, पायाभूत सुविधांची निर्मिती यासह अनेक योजनांना राज्यात गती - राज्यपाल रमेश बैस

Tue Feb 28 , 2023
मुंबई :- महाराष्ट्र हे देशातील एक अग्रगण्य राज्य आहे. राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत अनेक योजना, उपक्रम राबविण्यात येत असून 1 लाख 25 हजार रोजगार निर्मितीसाठी 45 कंपन्यांशी सामंजस्य करार केले आहेत. अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ‘ याअंतर्गत 50 हजार रूपये प्रोत्साहनपर लाभ दिला आहे. मुंबईत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com