विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समवेत विभागीय आयुक्तांची बैठक

नवीमुंबई :- भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणूकी संदर्भात माहिती व सूचना देण्याकरिता विविध पक्षाच्या प्रतिनिधींची कोकण विभागीय आयुक्त पी.वेलरासू यांनी बैठक घेतली.

या बैठकीस उपआयुक्त (आस्थापना) विवेक गायकवाड, उपआयुक्त (सामान्य) अमोल यादव, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे, तसेच भारतीय जनता पक्ष , शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल, बहुजन समाजवादी पार्टी अशा विविध पक्षाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. यासाठी सोमवार, दि.10 जून 2024 रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीचा दिनांक निहाय कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणूकीच्या अनुषंगाने आवश्यक माहिती व सूचना देण्याकरिता पक्षाच्या प्रतिनिधींची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत आयुक्त पी. वेलरासू यांनी निवडणूक कालावधीत लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेसंबधी माहिती, मतदार नोंदणी विषयी जनजागृती बाबत आवाहन, मतदान केंद्रांची माहिती, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माहिती अशा विविध विषयांची माहिती दिली. यावेळी निवडणूकी संदर्भात पक्षाच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या शंकांचे आयुक्त पी.वेलरासू यांनी सोप्या शब्दात निरसन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुंबई शिक्षक व पदवीधर,कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक जाहीर

Fri May 10 , 2024
नवीमुंबई :- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. यासाठी सोमवार, दि.10 जून 2024 रोजी मतदान होणार असल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त पी.वेलरासू यांनी आज पत्रकार परिषदेद्वारे दिली. भारत निवडणूक आयोगाकडून घोषित कार्यक्रमानूसार बुधवार, दि.15 मे 2024 रोजी अधिसूचना जारी केली जाईल. या निवडणुकीसाठी बुधवार, 22 मे 2024 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com