पेंच पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या टेकाडी उपविभागातील बोरी सिंगोरी गावात कालवा फुटल्याने शेतकऱ्यांच्या गहू व हरभरा पिकांचे मोठे नुकसान

पारशिवनी:- तालुका तिल पेंच पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या टेकाडी उपविभागातील बोरी सिंगोरी गावात आज कालवा फुटल्याने आज गावातील 10 ते 15 शेतकऱ्यांचे उभे असलेले गहू व हरभरा पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. आज मंगलवार 27 रोजी सकाळी शेतकरी शेतात गेले होते. आणि बघता बघता ते भरले आहे.त्यांच्या पिकांमध्ये पाणी शिरले आहे.हे पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. शेतकऱ्यांनी सकाळी आठ वाजता पाटबंधारे अधिकाऱ्यांना कळवले.त्यांनी थेट शेतकऱ्यांशी बोलणे सुरू केले.त्यानंतर शेतकऱ्यांनी शेतकरी नेत्यांना कळवले. याबाबत शेतकरी संजय सत्येकर यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेऊन तहसीलदारांना प्रशात सांगळे यांना माहिती दिली व सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी व भ्रष्ट पाटबंधारे विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रग्रती शिल प प्रुरुस्कृत शेतकरी संजय सत्येकर यांनी केली आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com