कामठी येथिल रक्तदान शिबिरात 45 रक्तदात्यांनी केले रक्तदान

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

 कामठी :- भीम आर्मी संविधान रक्षकदलाच्या वतीने जयस्तंभ चौक परिसरात भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 45 रक्तदान त्यांनी रक्तदान केले भीम आर्मी संविधान रक्षक दल कामठी तालुका अध्यक्ष राहुल ढोरे यांचे हस्ते दीप प्रज्वलन व तथागत भगवान गौतम बुद्ध ,भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,क्रांतीज्योती महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली यावेळी कामठी शहर अध्यक्ष अस्मिता बनसोड ,बापू पाटील, विनय खोब्रागडे ,अक्षय बांबुर्डे ,अमित फुलझेले ,सुप्रिया फडणीक ,रिता महाले ,नीतू येवले, यशवंत खोब्रागडे,आनंद खोब्रागडे ,प्रमोद खोब्रागडे आदी उपस्थित होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना राहुल ढोरे म्हणाले रक्तदान एक चळवळ समजून तरुणानि पुढाकार घेण्याचे आवाहन केले रक्तदान शिबिरात 45 रक्तदात्यांनी रक्तदान केले डागा हॉस्पिटल नागपूरचे डॉक्टर रवींद्र, वर्षा बालपाडे ,वंदना झाडे ,राहुल भोयर यांच्या पकाने रक्त संकलन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सामाजिक समरसता दिवस,कामठी भाजपा प्रभाग 15 तर्फे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

Sat Apr 15 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कामठी प्रभाग 15 तील 5 बुथ वर सामाजिक समरसता दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी आनंद नगरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भाजपा कामठी भाजपा अनुसूचित जाती आघाडी कामठी शहर अध्यक्ष विक्की बोंबले यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.त्या नंतर पाच ही बुथ अंतर्गत असलेल्या पुतळ्याना माल्यार्पण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com