संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- दसऱ्याच्या पर्वावर प्रतिवर्षानुसार रावण दहन उत्सव समितीच्या वतीने रुईगंज क्रीडांगणावर आयोजित रावण दहन कार्यक्रमाला भर वादळी पावसातही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला .
रावण दहन उत्सव समितीच्या वतीने रुई गंज क्रीडांगणावर भव्य रावणाची प्रतिमा तयार करण्यात आली होती वादळी पावसाला सुरुवात झाल्याने रावणालाही रेनकोटचा आसरा देण्यात आला होता. रावनंदहन उत्सव समितीच्या वतीने सजविलेला रथावर राम ,लक्ष्मण ,सीता, हनुमानसेना ढोल,ताशाच्या,फटाक्यांची आशीतबाजीत आले व रावण दहन करण्यात आले. या रावण दहन कार्यक्रमाला माजी मंत्री व भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, आमदार टेकचंद सावरकर, माजी जिल्हा परिषद चे अध्यक्ष सुरेश भोयर, अजय अग्रवाल,माजी नगराध्यक्ष शहाजहा शफाअत अन्सारी, माजी नगराध्यक्ष प्रमोद उर्फ गुड्डू मानवटकर, नीरज यादव, हाजी शकूर नागाणी, मूलचंद सीरिया, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष संजय कनोजीया, नगर काँग्रेस कमिटी अध्यक्ष कृष्णा यादव, राजेश दुबे सह गणमान्य नागरिक उपस्थित होते.
बॉक्स-आडापूल श्री साईबाबा मंदिर परिसरात प्रति वर्षानुसार यावर्षी सुद्धा रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कन्हान साई मंदिरातून भव्य शोभायात्रेने राम लक्ष्मण सीता सजविलेल्या रथावर ढोल ताशे फटाक्याच्या आतिषबाजीत येऊन श्रीकृष्ण साईबाबा मंदिराचे संस्थापक श्रीकृष्ण देवनाथ बाबा यांचे हस्ते पूजा आरती करून रावण दहन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली रावण दहन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजारो भाविक भक्त उपस्थित होते रावण दहन झाल्यावर भाविक भक्तांनी एकमेकांना आपट्याच्या पानाचा सोनं देऊन दसरा महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या रावण दहन कार्यक्रमानिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता जुने कामठीचे ठाणेदार राहुल शिरे, नवीन कामठीचे ठाणेदार संतोष वैरागडे यांचे मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता