शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्या निमित्ताने नागपूर जिल्ह्यात ३५० फोटो फ्रेमचे वाटप

 नागपूर :-देवाला दुधाचा अभिषेक करून सत्तेसाठी झगडणारे खूप जण पाहिले पण रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य निर्माण करणारे एकच राजे छत्रपती शिवराय माझे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजे ६ जून १६७४ या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक झाला. केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर साऱ्या देशाच्या दृष्टीने ही एक असाधारण गोष्ट होती, एक सुवर्णक्षण होता. या ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळा महोत्सवाच्या आयोजनाने महाराजाचे कृतज्ञ स्मरण करणे, त्यांच्या असाधारण कर्तृत्वाचा जागार करणे, त्यातून निर्माण होणाऱ्या उर्जेतून सत्कार्याची वाट उजळने हा दैवी योग तर सध्या होईलच पण यासह नव्या पिढीपर्यत महाराजाच्या हा पराक्रमी वारसा पोहोचेल, त्यातून प्रेरणा घेत नवी पिढी सर्वच क्षेत्रात आपल्या प्रतिभेने अग्रेसर राहिल याच विश्वासाने प्रेरित होऊन भारतीय जनता युवा मोर्चा चे उपाध्यक्ष व व्हि एन रेड्डी रिसर्च अण्ड डेव्हलपमेन्ट फाऊण्डेशन चें संस्थापक अध्यक्ष  व्हि एन रेड्डी यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्यभिषेक सोहळ्या निमित्त संपूर्ण नागपूर जिल्हयात महारांजांचे ३५० फोटो फ्रेम वाटपाचा हा एक असाधारण निर्णय घेतला आहे. या सुवर्णक्षणाची आपण एक साक्ष बनून महाराजांच्या अद्भुत प्रतिभेच्या दिव्यत्वाचा अफाट सामर्थ्याचा साक्षात्कार घेऊया असा संदेश व्हि एन रेड्डी रिसर्च अण्ड डेव्हलपमेन्ट चे संस्थापक अध्यक्ष व्हि एन रेड्डी यांनी केला आहे.

NewsToday24x7

Next Post

सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयातील सलोनी धार्मिक बुटोबोरी विभागातून टॉपर हिचा आमदार अँड. अभिजित वंजारी यांच्या शुभहस्ते सत्कार

Sat May 27 , 2023
नागपूर:- बारावी बोर्डाच्या मार्च 2023 च्या परीक्षेमध्ये अमर सेवा मंडळ, नागपूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, बुटीबोरी, नागपूर येथील विज्ञान शाखेची सलोनी देवेंद्र धार्मिक ही 83.50% घेवून ही बुटीबोरी विभागातून टॉपर आली आहे. अमर सेवा मंडळाचे सचिव तथा पदवीधर मतदारसंघ नागपूर विभागाचे आमदार अँड. अभिजित गो. वंजारी यांच्या शुभहस्ते सलोणी धार्मिकचा पुष्पगुच्छ प्रदान करून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कनिष्ठ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com