मातीच्या मलब्याखाली दबून मजुराचा मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी रोड वरील ऑरेंज सिटी टाऊनशीप जवळील केसर लँड नामक टाऊनशीप मध्ये निशांत सिंग बोत्रा यांच्या मालकीच्या घराचे बांधकाम करत असताना 12 फूट खोल पिल्लरचा लोह्याचा पिंजरा बांधण्यासाठी 12 फूट खाली उतरून दोन मजूर काम करीत असताना अचानक वरील माती घसरल्याने या मातीच्या मलब्यात दबून दोघांपैकी एकाचा त्या मलब्यातच दुर्दैवी मृत्यु झाला तर दुसरा सुदैवाने बचावला.ही घटना काल सायंकाळी 5 दरम्यान घडली असून मृतक मजुराचे नाव अजय बोकडे वय 40 वर्षे रा यशोधरा नगर नागपूर तर बचावलेल्या मजुराचे नाव मनोज इंदूरकर वय 55 वर्षे रा नागपूर असे आहे.

सदर मृतक हा रमेश सूर्यवंशी नामक कंत्राट दाराकडे सेन्टरिंग व लोहा बांधण्याचे काम करीत असून दैनंदिन नुसार काल सकाळी केसर लॅंड मध्ये सुरू असलेल्या कामाच्या ठिकानी कामावर जाऊन लॉन मध्ये निशांत सिंग बोत्रा यांच्या घराच्या बाँधकामाच्या कामातील 12 फूट खोल खड्ड्यात पिल्लरचे बांधकाम करून लोह्याचा पिंजरा उभा करीत असता अचानक वरून माती घसरली व त्या मातीच्या मलब्यात दबलेल्या मजुरांना काढण्यासाठी माती बाहेर काढली असता त्यातील एक मजुराचा जागीच मृत्यू झाला तर एक बचावला असून बचवलेल्या इसमाचा आशा हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे.नवीन कामठी पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतदेहाच्या पार्थिवावर शविच्छेदन करीत अंत्यसंस्कार करण्यात आले.मृतकाच्या पाठीमागे एक भाऊ,पत्नी व दोन मुले असा बराच मोठा आप्तपरिवार आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासासाठी कटिबद्ध, प्रकाश हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज मध्ये रोटी बँक ट्रस्टची ग्वाही

Sat Aug 5 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासासाठी कटिबद्ध असुन शक्य ती मदत करण्याचे आश्वासन रोटी ट्रस्ट नागपुर तर्फे प्रकाश हायस्कुल & ज्युनिअर कॉलेज, कांद्री माईन येथील विद्यार्थ्यांना देण्यात आले. शनिवार (दि.५) रोटी बँक ट्रस्ट नागपुर च्या पदाधिकाऱ्यांनी प्रकाश हायस्कुल & ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईन ला सदिच्छा भेट दिली. आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मिलिंद वान खेडे तर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com