सिंधुदुर्ग मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नुकसानीची संयुक्त समिती चौकशी करणार

नवी दिल्‍ली :- सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुर्देवाने खराब हवामानामुळे झालेल्या नुकसानाची चौकशी करण्यासाठी भारतीय नौदलाच्या अध्यक्षतेखाली एक संयुक्त तांत्रिक समिती स्थापन करण्यात येत असून त्यात महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी आणि तांत्रिक तज्ञांचा समावेश आहे.

मराठा नौदल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सागरी संरक्षण आणि सुरक्षेचा वारसा आणि आधुनिक भारतीय नौदलाबरोबर त्याचे ऐतिहासिक नाते यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने, सिंधुदुर्गात प्रथमच आयोजित नौदल दिनाच्या समारंभाचा भाग म्हणून 4 डिसेंबर 23 रोजी या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. राज्य सरकारच्या समन्वयाने भारतीय नौदलाने या प्रकल्पाची संकल्पना तयार केली होती आणि त्यासाठी राज्य सरकारने निधीही उपलब्ध करून दिला होता.

पुतळा लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी आणि पुनर्स्थापित करण्याच्या सर्व उपाययोजनांमध्ये मदत करण्यासाठी भारतीय नौदल वचनबद्ध आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर - राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांचे प्रतिपादन

Thu Aug 29 , 2024
– महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांचे विशेष व्याख्यान वर्धा / नागपूर :- भारत आर्थिक महासत्ता बनण्‍याच्‍या मार्गावर आहे.आर्थिक समृद्धी साधल्यास भारताचे भविष्य उज्ज्वल असेल.कामगार, उद्योग आणि उद्योग भारताची भविष्यातील दिशा ठरवतील असे प्रतिपादन राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी केले. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयात आयोजित ‘भावी जगात भारत’ या विषयावर विशेष व्याख्यान देतांना ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!