कामठी ता प्र 24 :- नुकतेच 18 डिसेंबर ला कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीच्या सरपंच तसेच सदस्य पदासाठी 122 मतदान केंद्रावर निवडणूक मतदान पार पडले .या मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनच्या सुरक्षिततेसाठी कामठी तहसील कार्यालयात असलेल्या स्ट्रॉंग मशीन कक्षात देखरेख साठी कर्तव्यावर हजर असलेल्या एका गृहरक्षक 25 वर्षीय होमगार्डला अस्थीव्यंगाचा झटका पडल्याची घटना 18 डिसेंबर ला निवडणुकीच्या दिवशी सकाळी 6 दरम्यान घडली असून सदर होमगार्ड हा नागपूर च्या मेडिकल रुग्णालयात अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देत आहे.या होमगार्ड चे नाव छगन देशमुख शिव पंचायत मंदिर जवळ कामठी असे आहे.
प्राप्त माहितीनुसार 18 डिसेंबर ला होणारी ग्रामपंचायत निवडणूक योग्यरीत्या पार पडावी यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता त्यातच मृत्यूशी झुंज देत असलेला आजारी होमगार्ड छगन देशमुख सह काही महिला पुरुष होमगार्ड ची अधिवेशन बंदोबस्त च्या नावावर कळमना पोलीस स्टेशन ला नेमणूक करण्यात आले होते मात्र 18 डिसेंबर ला निवडणूक बंदोबस्त साठी कमी पडत असलेला मनुष्यबळ लक्षात घेता नवीन कामठी पोलिस स्टेशन विभागाच्या वतीने कळमना पोलीस स्टेशन मधून नेमणुकी वर असलेले चार महिला होमगार्ड व पाच पुरुष होमगार्ड ची कामठी तहसील कार्यालयात बंदोबस्त कर्तव्यावर नेमणूक करण्यात आली .त्यानुसार होमगार्ड छगन देशमुख ची कामठी तहसील कार्यालयाच्या स्ट्रॉंग रूम च्या नियंत्रणासाठी पोलीस अधिकारी सह नेमणूक करण्यात आली होती.दरम्यान या संवेदनशील कक्षात नोकरी बजावून कर्तव्यावर हजर असता 18 डिसेंबर ला सकाळी सहा वाजता अचानक अस्थिव्यंग ब्रेन हेमरेज चा झटका आल्याने त्याला त्वरित एका अन्सारी नामक खाजगी डॉक्टर कडे उपचारार्थ हलविण्यात आले मात्र परिस्थिती नाजूक असल्याने त्याला नागपूर च्या मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले असता उपचारा दरम्यान त्याला अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले असून सदर आजारी होमगार्ड मृत्यूशी झुंज देत आहे.