– स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची कारवाई एकुण ६,६८,०००/-रूपयाचा मुद्देमाल जप्त
नागपूर :- दि. १५/०१/२०२४ रोजी रात्री दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे पो. स्टे, अरोली हद्दीत खाजगी वाहनाने पेट्रोलींग करीत असताना गुप्त बातमीदार यांचे कडून खात्रीशीर बातमी मिळाली कि, १ पांढऱ्या रंगाची फोर्ड किगो कार, व त्याचे मागे टाटा कंपनीचे ट्रक संशयितरित्या फिरत आहे, या बातमी वरून चोखाळा शिवार काचुरवाही रोडवर गेले असता फर्ड कार व एक मिळून आले. ट्रकची पाहणी केली असता त्यामध्ये अल्ट्राटेक सिमेंट बॅग दिसून आले. मिळून आलेल्या ट्रक व सिमेंट बाबत ट्रक चालकास सविस्तर विचारपूस केली असता, दिनांक १४/०१/२०२४ रोजी रात्री दरम्यान चाचेर येशील जय किसान पेट्रोलपंप याठिकाणी सिमेंट ने भरलेला ट्रक त्याचे अन्य दोन साथीदार यांचे सोबत फोर्ड फिगो कार क्र. MH-20-B-0202 ने पेट्रोलपंपावर जावून चोरी केली असल्याचे सांगितले, यावरून पो.स्टे. गुन्हे अभिलेख तपासले असता पोस्टे रामटेक येथे अपराध क्र. ३२/२०२४ कलम ३७९ भा.द.वि. चा गुन्हा नोंद असल्याने गुन्ह्यात चोरीस गेलेला टाटा कंपनीचा एक क MH-40/AK-6700 व सिमेंट बॅग तसेच गुन्ह्यात वापरलेली फोर्ड फिगो कार पंचासमक्ष जप्त करून गुन्हा उघडकीस आणला, आरोपी १) आकाश उर्फ मोगली प्रेमदास मोहने वय २४ वर्ष २) आकाश हिरामण भोसकर वय २४ वर्ष ३) आयुष्य किशोर वानखेडे वय २० वर्ष तिन्ही रा. चाचेर ता. मौदा व मुद्देमाल पुढील तपास प्रक्रियेकरिता पोलीस स्टेशन रामटेक यांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपोंकडून १) राडा कंपनीचा ट्रैक क्र MH-40/AK-6700 किमती ३,००,०००/- रु २) सिमेंटच्या १८० बॅग किमती ६८,०००/- रु चा ३) फोर्ड कंपनीची फिगो क्र MH-20-B-0202 किंमती ३,००,०००/- रु चा माल असा एकूण ६,६८,०००/- रु था मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नागपूर (ग्रामीण) हर्ष पोहार (भा.पो.से.) तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक कर्मलवार, पोलीस हवालदार रोशन काळे, अमोल कुथे, उमेश फुलवेल, प्रमोद भोयर, शंकर मडावी, नितेश पिपरोदे, पो.ना. विरेन्द्र नरड, विपीन गायधने यांनी पार पाडली.