-पो.स्टे. बुट्टीबोरी येथील सराईत गुन्हेगार टोळी प्रमुख १) मौसीन अब्दुल बेरा २) अतुल रंगलाल लालसरे ३) शाहरूख बाबर पठान ४) फिरोज इब्राहीम खान यांना कलम ५५ महाराष्ट्र पोलीस कायदयान्वये ६ महिन्याकरीता हद्दपार.
बुट्टीबोरी :- पोलीस स्टेशन बुट्टीबोरी व एमआयडीसी बुट्टीबोरी जिल्हा नागपूर ग्रामीण हद्दीमध्ये आपले गुन्हेगारी प्रवृत्तीने दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार टोळी प्रमुख १) मौसीन अब्दुल बेरा, वय ३५ वर्ष २) फिरोज इब्राहीम खान, वय २८ वर्ष ३) शाहरूख वावर पठान, वय २८ वर्ष सर्व रा. जुनी वस्ती बुट्टीबोरी जि. नागपूर ४) अतुल रंगलाल लालसरे, वय ३७ वर्ष रा. सातगाव ता. हिंगणा जि. नागपूर यांचे विरुद्ध नागपूर ग्रामीण पोलीसांनी कलम ५५ महाराष्ट्र पोलीस कायदयान्वये कार्यवाही करून त्यंना ६ महिन्याकरीता करीता नागपूर शहर व नागपूर जिल्हा ग्रामिण हद्दीतून हरपार केले आहे.
सदर आरोपी हे टोळीने एकत्र येवुन पोलीस स्टेशन बुट्टीबोरी व एमआयडीसी बुट्टीबोरी परीसरातील कंपनीतील लोखंड व कंपनीतील सुटे भागाची (स्पेअर पार्ट) अवैधरीत्या चोरी करून त्याची विक्री करीत होते. त्याबाबत सदरचे आरोपीतांवर पो.स्टे. बुट्टीबोरी व एमआयडीसी बुट्टीबोरी येथे कंपनीतील लोखंड व कंपनीतील सुटे भागाची (स्पेअर पार्ट) चोरीचे सबंधाने एकूण ०७ गुन्हे नोंद असल्याचे निर्देशनास आले आहे. आरोपीतांचे गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील राहणान्या लोकांचे, कंपनीची सुरक्षा करीत असलेले सुरक्षारक्षक व कंपनी व्यवस्थापकांच्या मनामध्ये प्रचंड दहशत निर्माण होवुन त्यांचे जिवीतास व कंपनीचे मालमत्तेस धोका निर्माण झालेला होता. त्यामुळे सदर आरोपीतांचे कृत्ये लक्षात घेता त्यांचे गुन्हेगारी कृत्याला आळा बसविण्याकरीता सराईत गुन्हेगारांचे टोळी विरुध्द कलम ५५ महाराष्ट्र पोलीस कायदयांतर्गत विशाल आनंद पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामिण यांनी दि. ०९/०५/२०२३ रोजी त्यांचे विरुद्ध नागपूर शहर व नागपूर जिल्हा ग्रामीण हद्दीतुन ६ महिन्याकरीता हदपारीची कारवाई केलेली आहे. सदरचा प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, प्रतिबंधक सेलचे पोउपनि भारत थिटे, पोलीस हवालदार विजय डोंगरे व निलेश बर्वे यांच्या सहकायनि केली आहे.