कुंभारे कॉलोनीतील बेपत्ता मुलाचा शोध लावण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कुंभारे कॉलोनीतुन वंश प्रवीण मेश्राम नामक 9 वर्षीय बालक बेपत्ता झाल्याची घटना 30 मार्च ला दुपारी 3 दरम्यान घडल्याने बेपत्ता मुलाच्या कुटुंबियांसह पोलिसांची एकच तारांबळ उडाली होती.

या मुलाचा शोध घेणे हे पोलिसांना एक आव्हानच असल्याने पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न केले.अखेर पोलिसांना यशप्राप्त झाले व बेपत्ता झालेला हा मुलगा 3 एप्रिल ला गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आढळून आला असता पोलिसांनी त्या मुलाला गोंदियाहुन सुखरूप कामठी ला आणून मुलाची आई निशा मेश्राम यांच्या ताब्यात देण्यात आले.30 मार्च पासून बेपत्ता मुलगा आई समोर दिसताच मुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या आईचे मन गहिवरले.तसेच पोलिसांनी मुलाचा शोध लावल्याबद्दल पोलिसांचे आभार मानले.या बेपत्ता मुलाचा शोध लावण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे व सहकारी पोलिसांनी मोलाची कर्तव्यदक्ष भूमिका साकारली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

Thu Apr 4 , 2024
नागपूर :- दिनांक ०३.०४.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०७ केसेसमध्ये २७ ईसमावर कारवाई करून रू. २४,२८०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये ०३ केसेसमध्ये एकुण ०४ ईसमावर कारवाई करून रु. १४.६९५/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण २.७६९ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रु. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights