प्रवरा नदीपात्रात बचाव कार्य करताना बचाव दलाच्या तीन जणांना वीर मरण

मुंबई :- अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सुगाव बु. येथे प्रवरा नदीपात्रामध्ये दोन मुले बुडाली असल्यामुळे महसूल व वनविभाग मंत्रालय यांचे आदेशान्वये घटना स्थळावर शोध व बचाव कार्य करण्यासाठी राज्य राखीव पोलीस बलाचे अंतर्गत असलेले राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे येथील एक बचाव तुकडी दि.२२.०५.२०२४ रोजी १९.४४ वाजता रवाना करण्यात आली होती.

ही तुकडी घटनास्थळी पोहचून दिनांक २३.०५.२०२४ रोजी सकाळी ०६.०० वाजता अतिशय शौर्याने शोध व बचाव कार्य करतेवेळी नदी पात्रामधील पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे पाण्याचा तीव्रवेग व पाणी उसळी खात असल्यामुळे बोट पाण्याच्या भोवऱ्यात उलटून दुर्देवी घटना घडली. त्यात १ पोलीस अधिकारी व ४ पोलीस अंमलदार हे पाण्याच्या प्रवाहात अडकले, त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदे, सपोशि/०३ वैभव सुनिल वाघ आणि पोशि/ २८६ राहुल गोपिचंद पावरा यांना वीर मरण आले आहे. तसेच दुर्घटनाग्रस्त बोटीमधील २ पोलीस अंमलदार यांना वाचवण्यात यश आले, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक, राज्य राखीव पोलीस दल यांनी दिली आहे.

या घटनेची माहिती प्राप्त होताच महसूल मंत्री व अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आ. किरण लहामटे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, राज्य राखीव पोलीस बलाचे अपर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद, व स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली व वीरमरण आलेल्या अधिकारी व अंमलदार यांचे पार्थिवावर शासकीय इतमामात श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कार्पोरेट ग्राहकांसाठी महावितरणची संयुक्त देयक प्रणाली

Fri May 24 , 2024
नागपूर :- एकापेक्षा अधिक वीज जोडणी असलेल्या कर्पोरेट ग्राहकांसोबतच महामंडळे, नगरपालिका आणि इतर आस्थापनाच्या वीज ग्राहकांसाठी महावितरणतर्फ़े ‘वीज बिल अनेक – पेमेंट एक’ सुविधा देणारी संयुक्त देयक प्रणाली सुरु करण्यात आली आहे. संयुक्त देयक प्रणाली सुविधेनुसार एकापेक्षा अधिक वीज जोडण्या असलेल्या ग्राहकाला साध्या एका क्लिकवर एकच पेमेंट प्लॅटफॉर्मवरुन ग्राहकाच्या लघु आणि उच्चदाब श्रेणीतील सर्व प्रकारच्या वीज जोडण्यांची बिले सहजपणे बघता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com