काटोल येथे नवीन वर्षात पहिला दस्त नोंदविणाऱ्या पक्षकारांचा सत्कार

काटोल प्रतिनिधि :-दुय्यम निबंधक काटोल कार्यालय येथे नवीन वर्षात पहिला दस्त नोंदविणाऱ्या निर्मला चोपडे व शुभांगी सालोडकर यांचा मा. तहसीलदार अजय चरडे व दुय्यम निबंधक सुधाकर निमजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

नोंदणी विभागातर्फे सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी रूपेश वाघ, शिवम सुर्यवंशी, मनिष बागडे, निलेश गोडबोले, राजु उमाठे अमोल तागडे व इतर अनेक पक्षकार कार्यालयात उपस्थित होते.

नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वतीने त्वरित मूळ दस्त परत मिळाल्याबद्दल घेणार शुभांगी सालोडकर यांनी आनंद व्यक्त करुन नोंदणी विभागाचे आभार मानले. नोंदणी विभाग करीत असलेल्या कामाची त्यांनी प्रशंसा केली. तसेच यानंतर घरबसल्या दस्ताची नोंदणी होणार असून त्या योजनेचा लाभ सर्व पक्षकांनी घ्यावा अशी विनंती दुय्यम निबंधक यांनी जनतेला केलेली आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या 108व्या भारतीय विज्ञान कॉंग्रेसचे होणार उदघाटन

Mon Jan 2 , 2023
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि जितेंद्र सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्घाटन कार्यक्रमाला राहणार उपस्थित विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने समाजाला दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाचा आढावा घेणारे “प्राईड ऑफ इंडिया ” – “भारताची शान” प्रदर्शन या परिषदेचे प्रमुख आकर्षण नवी दिल्ली :-पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जानेवारी रोजी 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!