घरफोडी करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

नागपूर :- पोलीस ठाणे अजनी हद्दीत प्लॉट नं. ८०१, वृंदावन अपार्टमेंट, हनुमान नगर, नागपुर येथे राहणारे फिर्यादी करण प्रज्वलीत गौर, वय ३१ वर्षे, यांचे वडील घराला कुलूप लावुन कामनिमीत्त बाहेर गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे कुलूप तोडुन, घराचे आत प्रवेश करून, घरातील बेडरूम मधील लाकडी कपाटात ठेवलेले डायमंड रिंग, सोन्या-चांदीचे दागिने, असा एकुण किंमती अंदाजे १५,७५,०००/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे अजनी येथे पोउपनि मस्के यांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ४५४, ३८० भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करून, आरोपीचा शोध घेत आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपीला कोर्टातुन शिक्षा

Fri Mar 29 , 2024
नागपूर :- फिर्यादी नामे प्रमोद आनंदराम सयाम, वय ४८ वर्ष रा.प्राथमिक आरोग्य केंद्र पाचगाव यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. कुही येथे अप. क्र. ८३/२०२१ कलम ३५३, ३३२ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. फिर्यादी हे प्राथामिक आरोग्य केंद्र पाचगाव येथे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी या पदावर काम करीत असून, दि. ०६/०४/२०२१ चे ११.१५ वा. दरम्यान यातील फिर्यादी हे त्यांच्या सहका-या सोबत येणा-या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights