नागपूर :- फिर्यादी नामे प्रमोद आनंदराम सयाम, वय ४८ वर्ष रा.प्राथमिक आरोग्य केंद्र पाचगाव यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. कुही येथे अप. क्र. ८३/२०२१ कलम ३५३, ३३२ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता.
फिर्यादी हे प्राथामिक आरोग्य केंद्र पाचगाव येथे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी या पदावर काम करीत असून, दि. ०६/०४/२०२१ चे ११.१५ वा. दरम्यान यातील फिर्यादी हे त्यांच्या सहका-या सोबत येणा-या लोकांची कोवीड टेस्ट ची तपासणी करीत असताना यातील आरोपी नामे विशाल प्रकाश गिरी वय २१ वर्ष रा. आजनी, त. कुही व त्याचे वडील कोवीडची टेस्ट करण्याकरीता पाचगाव आरोग्य केंद्र येथे आले व माझी तपासणी लवकर करा व मला कोव्हीड आजारासंबंधाने निगेटिव्ह रिपोर्ट दया असे महणुन कोव्हीड चाचणी संबंधीचे लिक्वीड हाताने हलवुन बाहेर फेकण्याचा प्रयत्न करीत होता. फिर्यादीने आरोपीस हटकले असता आरोपीने मला गावाला लवकर जायचे आहे असे म्हणुन फिर्यादीसोबत वादविवाद करून हाताबुक्याने मारहाण केल्याने फिर्यादीच्या उजव्या कपाळावर व डोळयाजवळ दुखापत झाली. व आरोपीने सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून गुन्हा नोंद केला. सदर प्रकरणाचे तपास पोउपनि सारिका गुरूकर यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता ए. डी. जे. ०१ पवार कोर्टामध्ये सादर केले. आज दिंनाक २८/०३/२०२४ रोजी ए. डी. जे. ०१ पवार यांनी वरील नमुद आरोपीला कलम ३५३ भादवि मध्ये ६ महिने साधा कारावास व ३०००/- रू. दंड दंड न भरल्यास २ महिने साधा कारावास तसेच कलम ३३२ भादवि मध्ये ६ महीने साधा कारावास व ३०००/-रू. दंड दंड न भरल्यास २ महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.
सरकारचे वतीने एपीपी डगोरीया सगो. यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी अंमलदार म्हणुन सफौ. रमेश ताजने यांनी मदत केली आहे.