पोलीस स्टेशन काटोल :- अंतर्गत सुशिला पुरम सावरगाव रोड काटोल ०१ कि मी उत्तर यातील अज्ञात आरोपीने फिर्यादीचे घराचे दरवाजाचे लॉक तोडुन बेडरूम मधील आलमारीचे लॉकर उघडुन त्यातील ११ ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफ कि. ३०,०००/- रू., सोन्याची अंगठी वजन ०५ ग्रॅम कि. १२,०००/- रू., पर्स मधील नगदी ३,००० /- रू असा एकूण ४५,०००/- रू चा माल दिनांक ०३/०६/२३ से २०.३० वा ते २९.३० वा दरम्याण चोरून नेला.
सदर प्रकरणी फिर्यादी नामे अमोल मोहन धापोडकर वय ४१ वर्षे रा. सुशिला पुरम काटोल यांचे रिपोर्टवरून पो. स्टे. काटोल येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ४५७,३८० भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आगासे पो स्टे काटोल करीत आहेत.