घटना दुरुस्तीची शिफारस केंद्र सरकारकडे त्वरित करावी- ॲड.नंदा पराते 

नागपूर :- हलबा समाज सांस्कृतिक मंडळच्या माध्यमाने बेसा येथे हलबा समाज बांधवांच्या भव्य मेळावा संपन्न झाला. यामेळाव्यात सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज,भगवान बिरसा मुंडा ,महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज,सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊ यांच्या फोटोला मान्यवरांनी माल्यपूर्ण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ कामगार नेते विश्वनाथ आसई तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार टेकचंद सावरकर, विकास कुंभारे, मोहन मते व प्रदेश काँग्रेस सरचिटणीस ॲड. नंदा पराते, माजी नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे, बँक नेते धनंजय धापोडकर,आयकर आयुक्त प्रदीप हेडाऊ, अपर जिल्हाधिकारी चंद्रभान पराते, नगर पंचायत प्रशासक भारत नंदनवार ,ओमप्रकाश पाठराबे, अभय धकाते, रेखा निमजे , डॉ. प्रा.देवराम नंदनवार हे मंचावर उपस्थित होते.

या मेळाव्यात आमदार विकास कुंभारे म्हणाले कि समाजाचा प्रश्नाबाबत विशेषतः हलबांच्या जुन्या अभिलेखामध्ये कोष्टी (विणकरी) व्यवसायाची नोंद असल्याने या नोंदीच्या सुधारणेसाठी घटना दुरूस्तीची शिफारस महाराष्ट्र शासनाने त्वरीत करावी व समाजाचे इतर प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न केलेत परंतु यश आले नाही.

आमदार टेकचंद सावरकर म्हणाले कि बेसा-पिपळा या भागात मोठया प्रमाणात हलबा बांधव असल्याने या ठिकाणी समाज भवन निर्माण करेल आणि हलबांच्या प्रश्नावर मी नेहमी सोबत राहील.

प्रदेश काँग्रेस सरचिटणीस ॲड.नंदा पराते ह्या मेळाव्यात मार्गदर्शन करतांना म्हणाल्या कि संविधान यादीत हलबांचा समावेश असून आरक्षण आहे परंतू हलबांनी विणकरी व्यवसाय स्वीकारल्याने कोष्टी या धंद्यांची नोंद झाली ,ती नोंद दुरुस्तीसाठी भाजप-शिवसेना सरकारकडे १० वर्षांपासून मागणी रेटली तरी अजूनपर्यंत महाराष्ट्र सरकारने घटना दुरुस्तीची शिफारस केंद्र सरकारकडे केली नाही म्हणून हलबांचा असलेला प्रचंड असंतोष येत्या निवडणुकीत दिसेल. 

हलबा मेळाव्याचे अध्यक्ष जेष्ठ कामगार नेते विश्वनाथ आसई म्हणाले कि हलबांच्या प्रश्नावर बीजेपीच्या सत्ताधारी नेत्यांनी मागील १० वर्षात दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही म्हणून हलबांचा विश्वासघात झाला. या विरोधात हलबा जमातीने भाजप हटाव -हलबा बचाव ही मोहीम सुरु केली.

या हलबा मेळावा कार्यक्रमात मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. हलबा समाज सांस्कृतिक मंडळ बेसा चे अध्यक्ष रामा नंदनकर यांनी माहिती दिली तर सुत्र संचालन ताराचंद बहारघरे यांनी केले. प्रास्ताविक धनंजय पखाले तर आभार प्रर्दशन अनिल रामटेककर यांनी केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी नथ्थू निनावे, भास्कर निनावे, नरेश दलाल, ममता सोनकुसरे ,बबन हेडाऊ,कैलास निनावे,रमेश सहारकर , ज्ञानेश्वर दाढे, यांनी अथक परिश्रम घेतले. हलबांच्या हलबी मातृभाषेत स्वागत गीत रमेश पौनीकर ,सारिका निनावे,अर्चना हेडाऊ, पुष्पलता बहारघरे यांनी सादर करून उपस्थितांचे मने जिंकून घेतली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ८४ प्रकरणांची नोंद

Thu Feb 22 , 2024
– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. बुधवार (ता.२१) रोजी उपद्रव शोध पथकाने ८४ प्रकरणांची नोंद करून ४७ हजार रुपयाचा दंड वसूल केला आहे. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com