बुट्टीबोरी :- अंतर्गत ०१ कि. मी. अंतरावरील मौजा वार्ड क्र. ०१ बुट्टीबोरी येथे दिनांक १४/०८/२०२३ वे २१. ३० वा. ते दिनांक १५/०८/२०२३ से ५.३० वा. दरम्यान फिर्यादी नामे- मोहसिन रशीद खान पठाण, वय ३८ वर्ष, रा. पठाण ले आऊट, वार्ड क्र. ०१ बुट्टीबोरी हे घराचे दरवाज्याला गेटला कुलुप लावुन उर्स पाहण्यासाठी नागपूरला गेले असता घरी परत येवून पाहणी केली असता घराच्या गेटला व दरवाज्याला कुलूप लागून दिसले नाही. गेट व दरवाजा दोन्ही उघडे होते. फिर्यादीने घराचे आत जावुन पाहणी केली असता स्वयंपाक घरात ठेवलेल्या लोखंडी कपाट उघडे दिसले. यावरून फिर्यादीने त्यांच्या पत्नीला फोन करून विचारणा केली असता तिने सांगितले की, कपाटाला लॉक केलेले नव्हते. कपाटात १) सोन्याचे मंगळसूत्र ०३ ग्रॅम किंमती २०००/- रु. २) सोन्याची अंगठी ०.३ ग्रॅम किंमती ९०००/- रु. ३) सोन्याचे कानातले ०३ ग्रॅम किंमती ९०००/- रु. ४) लहान मुलांचे चांदीचे कडे ०२ नग, कंबरपट्टा ०१ नग, पायपट्ट्या ०२ जोड़ी, चांदीची अंगठी किमती २०००/- रू. ५) नगदी रक्कम ३०००/- रू. ठेवलेले होते. यावरून फिर्यादीने कपाटाची पाहणी केली असता वर नमुद सोन्या-चांदीचे दागीने एकूण किंमती २९०००/- व नगदी असा एकूण ३२०००/- रू. या मुद्देमाल दिसुन आला नाही. कोणीतरी अज्ञात चोराने फिर्यादीचे घराच्या गेटचे व दरवाज्याचे कुलूप तोडून घराचे आत प्रवेश करून घरात ठेवलेल्या कपाटातुन वर नमुदप्रमाणे सोन्या-चांदीचे दागिने व नगदी रक्कम एकुण ३२०००/- रूपयाचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. बोरी येथे आरोपीविरुध्द कलम ४५७, ३८० भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास नापोशी / १७४ युनुस खान हे करीत आहे…