उमरेड :- पोस्टे उमरेड अंतर्गत मांगरुळ फाटा ते मांगरुळ गाव ता. भिवापूर जि. नागपूर येथे दि. २३/०१/२०२४ रोजी चे सकाळी ०४/३० वा. सुमारास यातील फिर्यादी व जखमी नामे गब्बर देवराव रेवतकर वय ४२ वर्षे रा. मंगरूळ ता. भिवापूर जि. नागपूर हे नेहमी प्रमाणे झोपेतुन उठुन मार्निंग वॉक करीता निघाले व घराचे समोरील रोडवर मॉर्निंग वॉक करित असतांना फिर्यादीचे मागुन आलेल्या मोटरसायकल वरील दोन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीला कोणत्यातरी अज्ञात कारणावरून ठार मारण्याचे उद्देशाने छन्याचे बंदुकीने फायरींग करून गावाच्या बाहेर निघुन गेले. त्यांचे बंदुकीतील एक छर्रा फिर्यादीचे चेहऱ्यावर उजव्या ओठाच्या खाली लागल्याने जखम झाली आहे. फिर्यादीवर बंदुकीने फायरींग करून जिवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत गब्बर रेवतकर हे किरकोळ जखमी झाले असुन अज्ञात मोटार सायकलवरील दोन अनोळखी इसम हे मोटार सायकलसह पळुन गेले.
सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. उमरेड येथे अनोळखी आरोपींविरुध्द कलम ३०७, ३४ भादंवि. सहकलम ३, २५ शस्व अधिनियम १९५९ कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर घटनास्थळी हर्ष पोद्दार (भा.पो.से.) पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण, राजा पवार उपविभागीय पोलीस अधिकारी उमरेड विभाग उमरेड तसेच पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर यांनी भेट दिली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश खोटेले पोस्टे उमरेड हे करीत आहे.