– पोलीस स्टेशन खापाची कार्यवाही
खापा :- दिनांक १९/०९/२०२४ रोजी पोलीस स्टेशन खापा येथील स्टाफ खापा हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, मौजा सोनपुर शिवारातील गावालगतचे नाल्यातुन ट्रॅक्टरद्वारे नाल्यातील रेतीची चोरी केली जात आहे. अशा माहिती वरून मौजा सोनपुर येथे नाकाबंदी केली असता आरोपी नामे प्रफुल बाजनघाटे रा सिरोंजी ता सावनेर जि नागपुर हा सोनपुर गावालगतच्या नाल्यातुन रेतीची चोरी करुन सोनपुर गावाकडे भरधाव वेगाने येतांना दिसला. सदरचे ट्रॅक्टर चालकाला ट्रॅक्टर थांबविण्यास सांगितले असता ट्रॅक्टर चालक हा त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर भरधाव वेगाने सोनपुर गावाकडे घेवुन गेला. ट्रॅक्टरचा पाटलाग केला असता यातील आरोपी हा सोनपुर गावातील हनुमान मंदीर जवळ ट्रॅक्टर सोडुन पळुन गेला, घटनास्थळाहुन सदर लाल रंग महोद्रा ४७५ डी आय सरपंच या कंपनीचा विना क ट्रॅक्टर किंमती ४,००,००००/- रू. लाल रंगाची ट्रॉली किंमती १,००,०००/-रू. व १ ब्रास रेती किंमती ३०००/- रू एक लोखंडी फावडे किंमती २००/- रू. दोन एप्लास्टीक घमेले किंमती २००/- रु एकुण ५०३४००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नामे-पोउपनि जगदीश पालीवार पोस्टे खापा यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. खापा येथे आरोपीविरुध्द कलम ३०३(२) बि.एन.एस २०२३, ४८(७), ४८(८) म.ज.म.स. १९६६, ४, २१, खाण आणी खनिज अधि १९५७, ३ सार्वजनीक संपत्ती नुकसान प्रतीबंधक अधिनीयम १९८४ कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात पोस्टे खापा येथील ठाणेदार पोनि विशाल गिरी यांचे नेतृत्वात पोउपनि जगदीश पालीवाल, पोउपनि सचिन जंगम यांनी पार पाडली.