चोरी करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पो.स्टे. उमरेड :- अंतर्गत एम आर ट्रेडर्सचे दुकान वासुरकर ले आउट उमरेड येथे दिनांक ०१/०८/२०२३ ते २०.०० वा.  दरम्यान फिर्यादी नामे- महफज अहमद बल्द नशीर अहमद, वय ३४ वर्ष, प्लाट नं १२ कळमना चौक कावळा पेठ याने आयुर्वेदीक कंपनीत औषधीचा व्यवहार करून त्याची रोख रक्कम बेडरूमध्ये ६००००/- रू ठेवली होती आणि फिर्यादीच्या हार्डवेअरच्या दुकानात ३००००/- रु. ची रोख ठेवले होते. दिनांक ०१/०८/२०२३ चे रात्री ०८/०० वा. दरम्यान दुकान बंद केले व दि. ०२/०८/२०२३ चे ०८/०० वा. दरम्यान दुकान उघडले असता शटरचे कुलूप तुटलेले दिसले व कपाटात ठेवलेले पैसे व बेडरूममध्ये ठेवलेले पैसे एकूण रक्कम ९००००/- रु. व डी. व्ही. आर किंमती अंदाजे २०००/- रु. असे एकुण ९२०००/- रुपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेला आहे.

सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. उमरेड येथे अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५७, ३८० भादवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र बाप पोस्टे उमरेड  हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले दिवंगत नितीन देसाई यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

Fri Aug 4 , 2023
मुंबई, दि. 4 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी जे.जे. रुग्णालय येथे दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले आणि त्यांचे अंतिम दर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा तसेच आमदार आशिष शेलार यांनीही दिवंगत नितीन देसाई यांच्या पार्थिवाला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. Follow us on Social Media x […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com