गोस्वामी समाज महासभा नागपूर, राष्ट्रीय संमेलन व गुणगौरव समारंभ

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- अखिल भारतीय गोस्वामी महासभा अंतर्गत गोस्वामी समाज महासभा नागपूर द्वारा राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन दिनांक 16/10/2022 रविवार ला सकाळी 10:00 वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर समस्त भारतातून प्रत्येक राज्यातून संतश्रेष्ठ महामंडलेश्वर पीटाधीश्वर महंत गुरुमूर्ती तसेच देवेंद्र फडणवीस (उपुख्यमंत्री), चंद्रशेखर बावनकुळे ( प्रदेश अध्यक्ष बी जे पी) च्या उपस्थितीत गोस्वामी समाजातील विविध क्षेत्रातील कर्मश्रेष्ठ महानुभाव मान्यवरांचे सत्कार एव मरणोपरांत अंगदान संकल्प जागृती तसेच गुणगौरव विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात येणार आहे. उपरोक्त कार्यक्रमात समाज बंधू भगिनींनी उपस्थित राहून संतश्रेष्ठ कर्मश्रेष्ठ मान्यवरांच्या मार्गदर्शनाच्या लाभ घ्यावा असे आवाहन कृष्णकांत गिरी ( अध्यक्ष) गोस्वामी समाज महासभा नागपूर यांनी केले आहे. यात समस्त पदाधिकारी मधूकर गोस्वामी, डॉ. राजकुमार गोसावी, प्रशांत गिरी, शेखर पुरी, महेश गिरी, अनिल गिरी,नितेश पुरी, प्रदीप पुरी, राजेश गोसावी तेजगीर गिरी, राजेंद्र गिरी, मुकेश पुरी, सचिन गिरी, विजय आगरकर, बाबा गोस्वामी, कृष्णा पुरी, उमेश गिरी, विनायक गिरी, उत्तमजी गिरी, रमेश पुरी, मोहन बन, इतर सहभागी आहेत.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com