– पोलीस स्टेशन खापरखेडाची कार्यवाही
नागपूर :- पोलीस स्टेशन खापरखेडा येथील स्टाफ खापरखेडा परिसरात अवैध धंदयावर रेड करणेकामी पेट्रोलिंग करित असताना मुखबिरद्वारे खबर मिळाली की, पारशिवनीकडुन एक ट्रक क्र. MH-40/CM- 7751 मध्ये अवैधरीत्या रेती भरून नविन भानेगाव टी पॉईंट खापरखेडा कडे येत आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून भानेगाव टी पॉईंट ते गेडाम पेट्रोलपंपचे मधात स्टाफचे मदतीने नाकाबंदी करून सदर ट्रक क्र. MH-40 / CM-7751 हा पारशिवनीकडुन नविन भानेगाव टी पॉईंट कडे येतांना दिसला. ट्रक चालकास थांबवुन तपासले असता सदर वाहनात १) गाडी चालक नामे संतकुमार बद्रीप्रसाद कुरील वय ४२ वर्ष, रा. वलनी कॉलनी काली मंदीरचे मागे ता. सावनेर २) कंडक्टर नामे- अमित प्रकाश आंबुलकर, वय २१ वर्ष, रा. पिपळा डाक बंगला ता. सावनेर जि. नागपूर हे सदर वाहनात अवैधरीत्या विनापरवाना रेतीची वाहतूक करतांना मिळुन आल्याने रेती वाहतुकीचा परवाना बाबत विचारपूस केली असता परवाना नसल्याचे सांगितले. तसेच मालक नामे- बलराम रामनाथ यादव, रा. चनकापूर याचे सांगणेवरून रेती चोरून आणल्याचे सांगितले. आरोपीतांच्या ताब्यातून १६ चक्का ट्रक क्र. MH-40 / CM-7751 किंमती ५०,००,०००/-. त्यात ११ ब्रास रेती किंमती ५५०००/-. असा एकुण वाहनासह ५०५५०००/-रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी पो.स्टे. खापरखेडा येथे आरोपीतांविरुध्द कलम ३७९, १०९, ३४ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपी क्र. १) व २) यांना सूचनापत्रावर सोडण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास खापरखेडा पोलीस करीत आहे.
सदरची कारवाई नागपुर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक ए. पोहार (भा.पो.से), अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान विभाग पुंडलिक भटकर यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन खापरखेडा येथील ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक अनिल राऊत, पोलीस हवालदार उमेश ठाकरे, शैलेश यादव,पोलीस नायक राजू भोयर, मुकेश वाघाडे, महिला पोलीस नायक कविता गोंडाणे पोस्टे खापरखेडा यांनी केली.