नागपूर :- पोलीस ठाणे वाटोडा हद्दीत प्लॉट न. ७. स्वामी नारायण मंदीर समोर, पेट्रोल पंप मागे राहणारे फिर्यादी सौरभ बाबाराव घवघवे वय ५७ वर्ष हे घरी असताना आरोपी मोबाईल क्र. ८४९२२५१४६१८ चा धारक व टेलीग्राम अकाउंट युजर आयडी @ ana6688@ecce9892 चा धारक यांनी फिर्यादीस पार्ट टाइम जॉबची ऑफर देवून टास्क पुर्ण केल्यास नफा देण्याचे आमीष दिले. फिर्यादीने टास्क पूर्ण केले असता त्यांना नफा झाल्याने त्यांना विश्वास झाला. आरोपिंनी फिर्यादिस गुंतवणुक केल्यास अधिक फायदयाचे आमीष दाखवून फिर्यादीस वेगवेगळे टास्क देवून वेगवेगळया खात्यात रक्कम गुंतवणुक करण्यास भाग पाडले. फिर्यादीने वेळोवेळी एकुण ३५,६०,२८४/- रु ची गुंतवणुक केली. फिर्यादीने रक्कम परत मागीतली असता आरोपीनी पुन्हा गुंतवणुक करण्यास म्हटले. फिर्यादांना फसवणुक झाल्याचे लक्षात आले. आरोपींनी फिर्यादीची एकुण ३५,६०,२८४/- रू नी आनलाईन आर्थिक फसवणुक केली.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे सायबर येथे पोउपनि औटी यांनी आरोपीविरुद्ध कलम ४२०, ३४ भा.दं.वि. सहकलम ६६(४) आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध घेत आहे. पुढील तपास सुरू आहे.