सावनेर :- अंतर्गत मौजा पांटगसावगी १२ कि.मी पूर्व यातील अल्पवयीन पिडीत मुलगा वय १५ वर्ष ७ महिने हा बाथरूमला बाहेर जातो, असे सांगुन घरून दिनांक २६/०८/२३ चे १५/०० वा. दरम्यान गेला असता, आज पावेतो परत आला नाही, फिर्यादीचे ने पती ने गावातील नदीकडे आजुबाजुच्या परीसरात व नातेवाईकांकडे, मित्राकडे शोध घेतला असता मिळून आला नाही. तरी त्याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून फिर्यादीचे कायदेशीर रखवालीतून पळवून नेले आहे. सदर प्रकरणी फिर्यादी नामे- कविता अमरलाल सयाम वय ३४ वर्ष रा. वार्ड क्र. १ पाटणसावंगी ता. सावनेर यांचे रिपोर्टवरून पोस्टे सावनेर येथे अज्ञात आरोपी विरूध्द कलम ३६३ भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि नागवे मोन हे करीत आहे.
अल्पवयीन मुलाला पळवून नेणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com