अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी दिली विविध बाजारपेठांना भेट

नागपूर :- स्वच्छ मार्केट स्पर्धेच्या अनुषंगाने मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी शहरातील विविध बाजारपेठे भेट देत बाजारपेठ परिसराची पाहाणी केली.

याप्रसंगी मनपाचे उपायुक्त गजेंद्र महल्ले, प्रकाश वराडे, नागपूर@२०२५चे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्हार देशपांडे, समन्वयक निमिष सुतारीया, गौरी सहस्रबुद्धे यांच्यासह मार्केट असोसिएशनचे प्रतिनिधी, संबंधित झोनचे सहायक आयुक्त, झोनल अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर या संकल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि नागपूर@२०२५ यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वच्छ मार्केट स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी आंचल गोयल यांनी मार्केटमधील स्वच्छता, डोअर टू डोअर कलेक्शन यांच्यासह इतर कार्या संदर्भात अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच मार्केट असोसिएशनच्या अध्यक्षांसोबत चर्चा केली. आंचल गोयल यांनी मंगळवारी बाजार, गड्डीगोदाम दुकानदास संघ, जरीपटका बाजार, कमाल बाजार, कॉटन मार्केट, संत्रा मार्केट, फिश मार्केट, नेताजी फुले मार्केट, ठोक व चिल्लर फूल विक्रेता, सीताबर्डी मार्केट, बुधवार बाजार, सक्करदरा मार्केट परिसराला भेट दिली.

यावेळी शहरातील मार्केटचा विकास व सौंदर्यीकरण करणे हे या स्पर्धेचे मुख्य उदिष्ट आहे. बाजारपेठ यांची स्वच्छता, कचरा वर्गीकरण, परिसरातील स्वच्छतेची स्थिती, सिंगल युज प्लास्टिकचा वापर न करणे, विविध उपक्रम राबविणे आदी विविध मापदंडानसंदर्भात श्रीमती गोयल यांनी बाजारपेठ परिसराची पाहणी केले. चर्चेदरम्यान मनपाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी मनपाद्वारे सुरु असलेले विविध स्वच्छता उपक्रमाची माहिती दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उन्हाच्या वेळेत क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ नका, क्रीडा व सांस्कृतिक विभागाची संघटनांना सुचना

Thu Mar 28 , 2024
नागपूर :- नागपूर शहरामध्ये उन्हाच्या वेळेत कुठल्याही क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये, अशी सुचना नागपूर महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागामार्फत क्रीडा व सांस्कृतिक संघटना आणि शाळा, महाविद्यालयांना देण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिका मुख्यालयात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी उष्माघात प्रतिबंध व नियंत्रण उपाययोजनेचा कृती आराखडा नियोजनाबाबत आढावा घेतला होता. त्यावेळी आयुक्तांनी केलेल्या सूचना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com