जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरुद्ध गुन्हा नोंद, एकूण २४९००००/- रू. चा मुद्देमाल जप्त

– पोलीस स्टेशन सावनेरची कारवाई

सावनेर :- दिनांक ०५/०८/२०२३ रोजी सकाळी ०७.०० वा. दरम्यान पोलीस स्टेशन सावनेर येथील स्टाफ पो.स्टे. सावनेर हद्दीत पेट्रोलिंग करीत असता काही इसम पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत खापा ते पाटनसावंगी रोडने अवैध जनावरे घेवुन येत आहे अशी गुप्त बातमीदारांकडुन माहीती मिळाल्याने रेल्वे क्रॉसिंग जवळ नाकाबंदी केली असता १) आयसर क्र. एम. एच. ४० / सी.डी.- २४२० २) पिकअप के एम. पी. २८ जी. ४२८९ ३) पिकअप क्र एम. एच. ४० / ए.के. -४२३१ अशी तिन वाहने यांची पाहणी केली असता १) आयसर क्र. एम. एच. ४०/ सी.डी. २४२० चे चालक आरोपी नामे- महेश सेवकराव जाधव, वय ४६ वर्ष रा. वार्ड क्र. १२ राजनादगाव छिंदवाडा त्याचे ताब्यातील वाहनाचे मागचे भागाचे डाल्यामध्ये १५ म्हशी किंमती अंदाजे ३,०००००/- रुपयाचे कोबुन कमी जागेमध्ये निर्दयतेने दोरांनी बाधुन दिसुन आल्या.

२) पिकअप वाहन क्र एम. पी. २८/जी. – ४२८९ चा चालक आरोपी नामे- सतिश सेवाराम भलावी वय २२ वर्ष रा. नजरपुरा ता. बिछवा जि. छिंदवाडा त्याचे ताब्यातील वाहनातील डाल्यामध्ये ५ म्हशी किमती अंदाजे १००००० /- रु. ३) बोलेरो पिकअप क्र. MH-४० AK ४२३१ वा चालक आरोपी नामे- रोशन आसाराम महापुरे, वय २२ वर्ष रा. बिरसानगर नागपूर याने आपले वाहनात ४ म्हशी व एक काळ्या रंगाचा म्हशीचा बछडा किंमती अंदाजे ९००००/- रु. या जनावरांची कोणतीही व्यवस्था नसतांना, निर्दयतेने कुरतेने कमी जागेमध्ये कोंबुन दोरांनी बांधुन धोकादायकरित्या विनापरवाना सदर आरोपी वाहतुक करतांना दिसुन आले. आरोपीतांच्या ताब्यातून एकुण जनावरे २४ म्हशी व एक बछड़ा किमती अंदाजे ४,९०,०००/- रु. असा एकूण वाहनासह २४,९०००० /- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपीताविरुद्ध पोलिस स्टेशन सावनेर येथे कलम ११ (१) (ए). (डी), (ई), (एफ), (आय) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शरद भस्मे  हे करीत आहे.

सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सावनेर येथील ठाणेदार रविंद्र मानकर, पोलीस हवालदार योगेश्वर झोडापे, पोलीस शिपाई नागरगोजे यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिवानीशी ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक

Sun Aug 6 , 2023
उमरेड :– अंतर्गत १६ कि. मी अंतरावरील मौजा पिरावा ता. भिवापूर जि. नागपूर येथे दिनांक ०४/०८/२०२३ चे १७.३० वा. दरम्यान यातील फिर्यादी बापुराव लोलबा गायकवाड, वय ७५ वर्ष, रा. पिराव ता. भिवापूर जि. नागपूर व आरोपी नामे— कमलाकर मोतीराम रखई, वय ४२ वर्ष, रा. पिरावा. ता. भिवापूर जिल्हा नागपूर हे एकाच गावात राहणारे असून एकमेकांना ओळखतात. फिर्यादी व आरोपी यांचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com