सावनेर :- दिनांक २७/०९/२०२३ च्या १९.०० वा. ते २०.०० वा. सुमारास पो.स्टे. सावनेर फिर्यादी ही दिनांक २७/०९/२०२३ रोजी सकाळी ११.०० वा. सुमारास कामावर गेली असता फिर्यादीची अल्पवयीन मुलगी वय १७ वर्ष ७ दिवस ही घरी एकटीच होती. फिर्यादीचा भाऊ व पत्नी हे दुपारी ०२.३० वा. घरी आले असता घराला कुलूप लागलेले होते असे त्याने फिर्यादीला फोनवर सांगितले फिर्यादीला वाटले की मुलगी ही सावनेर येथे क्लासला गेली असेल नंतर रात्री ०८.०० वा. फिर्यादी घरी परत आली असता घराला कुलूप लागलेले होते. फिर्यादीने घराचे लॉक तोडून घरी आतमध्ये जावून पाहीले असता मुलगी व तीची पर्स असलेली बॅग व आधार कार्ड घरी दिसले नाही तिचा गावातील ईकडेतिकडे, नातेवाईकाकडे फोन करून विचारले असता आमच्याकडे आली नाही असे सांगितले त्यामुळे फिर्यादीचे मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेले आहे.
सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. सावनेर येथे आरोपीविरुध्द कलम ३६३ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोखंडे हे करीत आहे.