संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 13:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गादा ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेले शिपाई ने कुंभारे कॉलोनी कामठी राहिवासी एका 22 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध गाठून लग्नाचे आमिष देत ठिकठिकाणी शारीरिक संबंध गाठले हा प्रकार 1 ऑक्टोबर 2018 ते 31 मार्च 2022 पर्यंत कायम राहला मात्र सदर तरुणाने लग्न दुसऱ्याशी केले असल्याची माहिती सदर तरुणीला कळताच तरुणीने प्रेमाच्या ओघात जाऊन स्वतःशी धोका झाल्याचा संताप व्यक्त करीत नविन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी ग्रा प कर्मचारी अतुल खुरपडी वय 28 वर्षे रा गादा विरुद्ध भादवी कलम 376(2)(एन) अनव्ये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.