संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– 25 लक्ष 99 हजार 680 रुपयाचा मुद्देमाल जप्त
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खैरी गावातील संगम फॉर्म हाऊस मध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्यावर मध्यरात्री 1 वाजता धाड घालण्यात पोलिसांना यशप्राप्त झाले असून या धाडीतून जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे सह इतर 16 जुगाऱ्याना ताब्यात घेत गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून नगदी 60 हजार 440 रुपये, 52 तास पत्ते , चादर , तीन चारचाकी कार,पाच दुचाकी असा एकूण 25 लक्ष 99 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एकूण 17 आरोपीमध्ये नागपूर जिल्हा परिषद सदस्य मोहन बापूराव माकडे वय 52 वर्षे रा भिलगाव कामठी,प्रकाश चंद्रभान मुंडले वय 38 वर्षे रा उप्पलवाडी,अमरेंद्र सिंग महेश्वर सिंग वय 45 वर्षे रा भिलगाव,अनिकेत मोहनदास कुमरे वय 28 वर्षे रा कमाल चौक,नागपूर,सुशील दिलीपराव शिंदे वय 32 वर्षे रा भिलगाव ,अक्षय कृष्णरावजी मडावी वय 32 वर्षे रा ऋषिकेश टाऊन भिलगाव,सिद्धार्थ बाबुराव नागदिवे वय 27 वर्षे रा पिवळी नदी नागपूर,प्रकाश मडावी वय 27 वर्षे रा भिलगाव, चंद्रशेखर काशिनाथ मथुरे वय 31 वर्षे रा लष्करी बाग नागपूर,स्वप्नील पुंडलिक गुडधे वय 31 वर्षे रा लष्करी बाग नागपूर,,नितीन शंकरराव बरबटकर वय 40 वर्षे रा पिवळी नदी नागपूर,सुरेश प्रहलाद सहारे वय 50 वर्षे रा भिलगाव ,गुणवत्ता आनंदराव माकडे वय 40 वर्षे रा भिलगाव,गणेश लालबहादूर राणा वय 44 वर्षे रा भिलगाव,प्रकाश नागदिवे वय 45 वर्षे रा पिवळी नदी नागपूर,विक्रांत विजय कंगाले वय 39 वर्षे रा भिलगाव,प्रीतम गजानन नागदिवे वय 35 वर्षे रा पिवळी नदी नागपूर असे आहे.ही यशस्वी कारवाही डीसीपी निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली डीसीपी पाच पथकाने केली.
@filephoto