जुगार धाड प्रकरणात जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे सह 16 जुगाऱ्यावर गुन्हा दाखल

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– 25 लक्ष 99 हजार 680 रुपयाचा मुद्देमाल जप्त

कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खैरी गावातील संगम फॉर्म हाऊस मध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्यावर मध्यरात्री 1 वाजता धाड घालण्यात पोलिसांना यशप्राप्त झाले असून या धाडीतून जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे सह इतर 16 जुगाऱ्याना ताब्यात घेत गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून नगदी 60 हजार 440 रुपये, 52 तास पत्ते , चादर , तीन चारचाकी कार,पाच दुचाकी असा एकूण 25 लक्ष 99 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एकूण 17 आरोपीमध्ये नागपूर जिल्हा परिषद सदस्य मोहन बापूराव माकडे वय 52 वर्षे रा भिलगाव कामठी,प्रकाश चंद्रभान मुंडले वय 38 वर्षे रा उप्पलवाडी,अमरेंद्र सिंग महेश्वर सिंग वय 45 वर्षे रा भिलगाव,अनिकेत मोहनदास कुमरे वय 28 वर्षे रा कमाल चौक,नागपूर,सुशील दिलीपराव शिंदे वय 32 वर्षे रा भिलगाव ,अक्षय कृष्णरावजी मडावी वय 32 वर्षे रा ऋषिकेश टाऊन भिलगाव,सिद्धार्थ बाबुराव नागदिवे वय 27 वर्षे रा पिवळी नदी नागपूर,प्रकाश मडावी वय 27 वर्षे रा भिलगाव, चंद्रशेखर काशिनाथ मथुरे वय 31 वर्षे रा लष्करी बाग नागपूर,स्वप्नील पुंडलिक गुडधे वय 31 वर्षे रा लष्करी बाग नागपूर,,नितीन शंकरराव बरबटकर वय 40 वर्षे रा पिवळी नदी नागपूर,सुरेश प्रहलाद सहारे वय 50 वर्षे रा भिलगाव ,गुणवत्ता आनंदराव माकडे वय 40 वर्षे रा भिलगाव,गणेश लालबहादूर राणा वय 44 वर्षे रा भिलगाव,प्रकाश नागदिवे वय 45 वर्षे रा पिवळी नदी नागपूर,विक्रांत विजय कंगाले वय 39 वर्षे रा भिलगाव,प्रीतम गजानन नागदिवे वय 35 वर्षे रा पिवळी नदी नागपूर असे आहे.ही यशस्वी कारवाही डीसीपी निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली डीसीपी पाच पथकाने केली.

@filephoto

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दारूचे बिल देण्याच्या वादातून हवेली बार मध्ये तोडफोड

Thu Mar 21 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- नेहमी चर्चेत असलेल्या रणाळा येथील हवेली बार मध्ये चार इसमानी दारू पिल्यानंतर दारूचे बिल देण्यावरून वाद घातला व हवेली बार अँड रेस्टऑरेंट मध्ये तोडफोड करून अश्लील शिवीगाळ देत पाहून घेण्याची धमकी दिल्याचा प्रकार काल रात्री 11 दरम्यान घडली असून यासंदर्भात फिर्यादी संकेत संजय यादव वय 27 वर्षे रा यादव नगर कामठी ने स्थानिक नवीन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!