ताशपत्त्यावर जुगार खेळणाऱ्या, तसेच अवैधरित्या हुक्का पार्लर चालविणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हे दाखल

नागपूर :- दिनांक २०.०५.२०२४ चे ०२.१५ वा. ये सुमारास, गुन्हेशाखा युनिट क. २ चे अधिकारी व अंमलदार यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, पोलीस ठाणे सितावर्डी हद्दीत मरीयम नगर, येथे काही ईसम ताशपत्त्यावर जुगार खेळत आहे. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, नमुद घटनास्थळी रेड कारवाई केली असता, तेथे आरोपी १) आशि दिलीपराव काळे वय ३३ वर्ष रा. खरबी, वाठोडा, नागपूर २) श्रीकांत दिनेश डुमरे, वय २३ वर्ष रा. साई बाबा नगर, खरबी, नागपूर ३) आरीफ रियाज खान वय २७ वर्ष रा. सदभावना नगर, नंदनवन, नागपूर ४) मयुर मोहन गिरडे वय २८ वर्ष रा. लालगंज, पाचपावली, नागपूर ५) महेन्द्र सुरेश शाहु वय २९ वर्ष रा. गजानन चौक, नागपूर ६) कपिल शेषराव निकोसे वय ३२ वर्ष रा. मुळे हाय स्कूल जवळ, धंतोली, नागपुर ७) संतोष गुप्तेश्वर श्रीवास्तव वय २९ वर्ष रा. सुरेन्द्रगड, गिट्टीखदान, नागपूर हे स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता ताशपत्त्याचा जुगार खेळतांना प्रत्यक्ष मिळुन आले. नमुद जुगार अड्डयाबाबत विचारपूस केली असत्ता, सदरचा जुगार अड्‌डा हा पाहिजे आरोपी क. १) अंकेश तुरकेल ०२) मार्टीन नावाचा ईसम दोन्ही रा. मरीयम नगर, सिताबर्डी हे चालवीत असल्याचे समजले. क. ३) वाहन क. एम.एच ४९ सि.एव ४१०५ चा चालक हा पळून गेला. घटनास्थळावरून आरोपींचे ताब्यातुन व डावावरून नगदी ३४,०००/- रु, वेगवेगळयां कंपनीचे ६ नग मोबाईल फोन, दुचाकी वाहन, व ईतर साहीत्य असा एकुण २,५९,२००/- रू. चा मुद्देमाल मिळाल्याने जप्त करण्यात आला. आरोपींना ताब्यात घेवुन, त्यांचेविरूध्द पोलीस ठाणे सिताबर्डी येथे कलम १२ महा. जुगार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना मुद्देमालासह सिताबर्डी पोलीसांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. पुढील तपास सुरू आहे.

दिनांक २०.०५.२०२४ रोजी, पहाटे ०४.३० वा. चे सुमारास गुन्हे शाखा युनिट क. ०२ चे अधिकारी व अंमलदार यांनी पेट्रोलींग दरम्यान, पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत, आनंद बिल्डींग, पहीला माळा, धरमपेठ, नागपूर येथील क्लाऊड कॅफे हुक्का पार्लर सुरू आहे, अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, सापळा रचुन रेड कारवाई केली असता, आरोपी हुक्का पार्लर मालक नामे मयंक गौरीशंकर अग्रवाल, वय ३५ वर्षे, रा. खापरीपूरा, नागपुर हा कॅफेमध्ये तंबाखुजन्य हुक्का फ्लेव्हर ग्राहकांना पुरवून विक्की करीत असतांना, समक्ष मिळून आला. त्यांचे ताब्यातुन १३ नग हुक्का पॉट व वेगवेगळे तंबाखुजन्य फ्लेव्हर असा एकुण किंमती ३४,८००/- रू. चा मुद्देमाल मिळुन आल्याने जप्त करण्यात आला, आरोपींचे हे कृत्य कलम ४(१) (२१), ५(१) (२१) कोटपा अॅक्ट नुसार होत असल्याने, आरोपीविरूध्द पोलीस ठाणे सिताबर्डी येथे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. आरोपीस मुद्देमालासह पुढील कारवाई कामी सिताबर्डी पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.

वरील कामगिरी पोलीस आयुक्त नागपूर शहर, सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस उप आयुक्त, (डिटेक्शन), मा. सहायक पोलीस आयुक्त, (गुन्हेशाखा), यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. २ चे अधिकारी व अंमलदार यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अटक

Wed May 22 , 2024
नागपूर :- फिर्यादी नामे साहील धिरज शेन्द्रे वय १९ वर्ष रा. प्लॉट नं. ११२, जुगलकिशोर ले-आउट, गोपाल नगर, नागपूर हा त्याचे घराशेजारी राहणारे मित्र नामे आशिष महादेव लोखंडे व त्याचा चुलत भाऊ विशाल मिलींद लोखंडे यांचेसह पोलीस ठाणे प्रतापनगर हद्दीत श्याम नगर झोपडपट्टी, पाण्याचे टाकी जवळुन जात असता तेथे राहणारे आरोपी क. १) कुलदिप उर्फ कुन्नू शंकरलाल भारद्वाज वय २० […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com