संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-ज्याला देव तारी त्याला कोण मारी
कामठी :- कामठी बस स्थानक मध्ये दुचाकीने बस स्थानक बाहेर जात असलेल्या दुचाकीस्वार तरुणाला बस ने दिलेल्या धडकेत अपघात घडला असून या अपघातात दुचाकीसह बस च्या समोरील चाकाजवळ पोहोचला मात्र वेळीच बस चालकाने ब्रेक मारल्याने अपघाती जख्मि ची घटना घडली मात्र अपघाती जीवितहानी घटना टळली ही घटना आज सकाळी 11 वाजता घडली.जख्मि तरुणाचे नाव आदित्य खडबडे वय 25 वर्षे रा विवेकानंद नगर कामठी असे आहे.या घटनेत बसचालकाच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली असली तरी ज्याला देव तारी त्याला कोण मारी या चर्चेला उधाण होते.
प्राप्त माहितीनुसार सदर जख्मि तरुण हा दुचाकी क्र एम एच 40 बी क्यू 6472 ने कामठी बस स्थानक मधून बाहेर पडत असताना बस क्र एम एच 40 ए क्यू 6309 च्या धडकेने गंभीर अपघात घडला धडकेच्या मोठ्या आवाजाने अपघात घडल्याचे लक्षात येताच बघ्यांनी मदतीची धाव घेत त्या जख्मि तरुनाला बस च्या खालून दुचाकीसह बाहेर काढले व त्वरित उपचारार्थ शासकीय रुग्णलयात दाखल केले.पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.