कामठी तहसील कार्यालयातील महसुल कर्मचाऱ्यांचा आजपासून राज्यव्यापी संप

संदीप कांबळे, कामठी

-तहसिलदार अक्षय पोयाम यांना सामूहिक निवेदन सादर
कामठी ता प्र 4:-अव्वल कारकून , मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती मागील दोन वर्षांपासून होत नसल्याने तसेच महसूल सहाय्यकाचे रिक्त पदे भरण्यात येत नसल्याने मंत्रालय स्तरावर अव्वल कारकून संवर्गातील पदोन्नतीचे प्रलंबित असलेले प्रस्ताव विभाग निहाय मान्यता देऊन नायब तहसिलदार पदी पदोन्नतीचे आदेश तात्काळ काढावेत, महसुल सहाययकाची रिक्त पदे तातडीने भरावीत या मागणीसाठी आज महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने आज 4 एप्रिल पासून बेमुद्दत राज्यस्तरीय आंदोलन पुकारले असून या आंदोलनाला कामठी तहसील कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवित बेमुद्दत आंदोलन करीत असल्याचे सामूहिक निवेदन तहसिलदार अक्षय पोयाम यांना देण्यात आले.
याप्रसंगी महसुल कर्मचारी संघटनेतील अव्वल कारकून एस जी चन्द्रीकापुरे, माधुरी उईके,नितीन , ज्योती गोरलेवार,गजेंद्र वंजारी आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठीच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आग प्रतिबंधक 'मॉक ड्रिल

Mon Apr 4 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 4:-सरकारी रुग्णालयात वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटना टाळण्यासाठी दर तीन महिन्यांनी मॉक ड्रिल करावे. त्यात अग्निशामक यंत्राचा वापर करण्याचे प्रशिक्षण सर्व कामगारांना द्यावे, अशा देण्याच्या सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत.या आदेशाचे पालन करीत आज कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकिय अधीक्षक डॉ धुपारे यांच्या मुख्य उपस्थितीत आग प्रतिबंधक मॉक ड्रिल करण्यात आले. शासनाने मार्गदर्शीत सूचना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com