खापरखेडा वीज केंद्राला कायमस्वरूपी कार्यकारी अभियंता (स्था) द्या!

– खापरखेडा वीज केंद्रात कार्यकारी अभियंता (स्था) पद नाही

नागपूर :-खापरखेडा औष्णिक वीज केंद्राला कायमस्वरूपी स्थापत्य कार्यकारी अभियंता द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भुषण चंद्रशेखर यांनी महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, संचालक संचालन, संचालक प्रकल्प यांच्याकडे निवेदनाद्वारेे केेली आहे.

खापरखेडा वीज केंद्र निर्मिती पासून कार्यकारी अभियंता (स्थापत्य) हे पद नसल्याने प्रशासकीय हिताची कामे रखडली आहेत. स्थापत्य कार्यकारी अभियंता हे अतिमहत्त्वाचे पद म्हणून गणले जाते.

खापरखेडा वीज केंद्राच्या विकासाला गती देण्यासाठी स्थापत्य बांधकाम विभाग निर्माण करण्यात आला आहे. या खात्यातील कार्यकारी अभियंता यांचे तांत्रिक सल्ल्याने रस्ता बांधकाम, नाल्या बांधकाम, स्वच्छता विषयक सोयी सुविधा व वीज केंद्रात कार्यरत महत्त्वाचे इतर विभागातील संबंधित महत्वाचे बांधकाम करिता दिशानिर्देश व मार्गदर्शनसाठी कार्यकारी अभियंता (स्था) पद महत्त्वाचे आहे. मात्र खापरखेडा वीज केंद्रात कार्यकारी अभियंता हे पद अस्तित्वात नाही. अतिरिक्त कार्यकारी अभियंता ही जबाबदारी वर्षानुवर्षे पासून सांभाळत आहेत. अधिकारी त्यांच्या स्वत:च्याच कामाच्या व्यापात अडकून असल्यामुळे त्यांना वेळ देणे शक्य होत नाही.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आक्षेपांच्या निराकरणानंतरच अंतिम निकाल विद्यार्थ्यांनी संभ्रम ठेवू नये; महाज्योतीचे आवाहन

Mon Nov 13 , 2023
नागपूर :- महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर संस्थेमार्फत 25 व 26 ऑक्टोबर 2023 रोजी एमपीएससी (राज्यसेवा) पूर्व प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी एकूण 8 शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आलेली होती. परीक्षेकरिता एकूण 39 हजार 786 उमेदवार पात्र होते. यामध्ये 19 हजार 173 उमेदवारांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. ‘महाज्योती’ने (राज्यसेवा) प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेच्या उत्तरपत्रिका प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांकडून आक्षेप मागविलेले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com