नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. १ ने अधिकारी व अंमलदार है पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. हद्दीत, पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून यशोदा नगर, सिमटाकळी येथील टेक्सास स्मोक शॉप येथे रेड कारवाई केली असता, तेथे आरोपी नामे नविन विजय खंडेलवाल, वय २८ वर्ष, रा. दत्तात्रय नगर, हुडकेश्वर नागपूर हा स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता ग्राहकांना प्रतिबंधीत वेगवेगळ्या फ्लेव्हरच्या ई-सिगारेटचा साठा करून विकी करतांना मिळुन आला. आरोपीचे ताब्यातुन वेगवेगळ्या फ्लेव्हरच्या ई-सिगारेट एकुण किंमती अंदाजे २,००,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीचे विरूध्द पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. येथे कलम ४, ५, ७. ८ ई-सिगारेट प्रतिबंधक अधिनीयम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीस मुद्देमालासह पुढील कारवाई कामी एम.आय.डी.सी. पोलीसांचे ताब्यात देण्यात आले.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपुर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपुर शहर, गहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली, पोनि, अमोल देशमुख व त्यांचे पथकाने केली.